<
जळगाव : येथील जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन आज दि. १ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे.
शिक्षक पतपेढीची नवीन इमारत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखेसमोर रिंगरोड येथे अजय कॉलनीत बांधण्यात आली आहे. येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पालकमंत्री एकनाथराव खडसे आहेत. तर उद्घाटन पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून आ.सुधीर तांबे, आ.किशोर दराडे, आ.शिरीष चौधरी, आ. राजूमामा भोळे, शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव, जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड, माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील, मेजर नाना वाणी, गफ्फार मलिक, संजय गरुड, ज्ञानेश्वर कानडे, यु.यु. पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
शिक्षकांनी, सदस्यांनी वेळेवर उपस्थिती द्यावी, असे आवाहन शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष शालिग्राम ज्ञानदेव भिरूड, उपाध्यक्ष भीमराव तुकाराम सपकाळे, मानद सचिव मनोहर जोहरमल सूर्यवंशी, खजिनदार निंबा यादव पाटील यांनी केले आहे.