Friday, June 26, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘स्वराज्यासह राष्ट्राचेही शिवराय हेच जनक’

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

रायसोनी महाविध्यालयात मिरवणुकीने व प्रा. शेख यांच्या व्याख्यानाने “शिवमहोत्सवाचा” समारोप

जळगाव, ता. २९ : छत्रपती शिवराय केवळ स्वराज्याचेच संस्थापक होते असे नाही, तर जाती, धर्मात व वतनदारीत अडकलेल्या भारताच्या राष्ट्रनिर्मितीचे संस्थापकही आहेत, असे प्रतिपादन शिवव्याख्याते व प्रा. जावेद शेख यांनी केले. शिवरायांनी शेतकरी व स्त्रिया या दोन्ही घटकांचा प्रचंड सन्मान केला. आजच्या राज्यकर्त्यांनी हा वारसा जतन करण्याचेही कार्य करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जी. एच. रायसोनी व्यवस्थापन व अभियांत्रिकी महाविध्यालयात ता. १९ ते २९ पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील शिवमहोत्सवातील समारोप कार्यक्रमात भव्य मिरवणूक काढण्यात आली तसेच नाशिक येथील प्रा. जावेद शेख यांचे ‘युवकांचे राजे-छत्रपती शिवाजी’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी अध्यक्षस्थानी रायसोनी तंत्रनिकेतनचे प्राचार्य तुषार पाटील होते. प्रा. शेख आपल्या मनोगतात पुढे म्हणाले की, शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी शेकडो वर्षांपासून भारतात राजेराजवाडय़ांची जुलमी राजवट होती. मोगलकर्त्यांनी जनतेवर अत्याचार, लूट केली. या प्रस्थापित राज्य व्यवस्थेविरोधात संघर्ष करण्याचे सामर्थ्यही तत्कालीन प्रजेत नव्हते. जुलमी राजवटीविरोधात लढण्याऐवजी निपचित पडलेल्या प्रजेच्या मनात स्वराज्याचा अंगार शिवरायांनी चेतविला. यापूर्वी कोणत्याही जुलमी राजाविरोधात साधा दगड भिरकावण्याची हिंमतही कोणी दाखवली नाही. अशा पीडित जनतेला शिवरायांनी जागृत केले. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होणार नाही याची काळजी शिवरायांनी घेतली. शत्रूकडील स्त्रीचाही सन्मान केला. जाती-पातीत वाटल्या गेलेल्या लोकांमधून केवळ गुणवत्तेच्या आधारावर मावळे, सेवेत अधिकारी नेमले. महात्मा फुले यांनी शिवरायांची समाधी शोधून पोवाडा लिहिला. कारण ते कुळवाडीभूषण होते. आजच्या राज्यकर्त्यांनी किमान शेतकरी आणि स्त्रियांचा सन्मान, गौरव करण्याचे देखील काम केले. छत्रपती शिवाजी महाराज हे तीन शब्द नुसते उच्चारले की सर्रकन अंगावर काटा उभा रहातो. महाराष्ट्रातच नाही,भारत देशातच नाही तर संपुर्ण विश्वात अतुलनीय्,अद्वितीय्,अलौकीक असा दुसरा शिवाजी राजा सापडण अवघड आहे.जगातल्या साहसी,पराक्रमी आणि सफल अशा राजांमध्ये शिवाजी महाराजांचा समावेश करावाच लागेल असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद खराटे, सिव्हील विभागाचे प्रा. शंतनू पवार हे व्यासपीठावर उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण अडकमोल व प्रगती पाटील यांनी केले. सदर शिव महोत्सवासाठी सागर सावंत, यश पाटील, अजिंक्य वडनेरे, प्रथमेश पाटील, प्रज्वल पाटील, संदीप सोनार, ध्रुव अग्रवाल, उज्वल जा, तेजस अत्तरदे, गणेश पाटील, अंकेश गुप्ता, गणेश शर्मा या विध्यार्थ्यानी मेहनत घेतली.  

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

१ मार्च रोजी जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

Next Post

जिल्हा परिषद शाळांमधील मुलांमधून घडत आहे आपल्या देशाचे उज्वल भविष्य -संपदाताई उन्मेशदादा पाटील यांचे प्रतिपादन

Next Post
जिल्हा परिषद शाळांमधील  मुलांमधून घडत आहे आपल्या देशाचे उज्वल भविष्य  -संपदाताई उन्मेशदादा पाटील यांचे प्रतिपादन

जिल्हा परिषद शाळांमधील मुलांमधून घडत आहे आपल्या देशाचे उज्वल भविष्य -संपदाताई उन्मेशदादा पाटील यांचे प्रतिपादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo