<
मान्यवरांच्या उपस्थितीत अत्याधुनिक मिनी सायन्स लॅबचे उद्घाटन
सायगाव – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सायगाव येथील सर्वोदय माध्यमिक विद्यालयात वकृत्व, गीत गायन, रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या स्पर्धकांना आज आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच आमदार मंगेश चव्हाण यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेला अत्याधुनिक मिनी सायन्स लॅब भेट दिली होती त्या लॅबचे देखील उद्घाटन यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश तात्या सोनवणे, युवा मोर्चा माजी जिल्हाध्यक्ष कपिल पाटील, अर्जुनदादा महाले, उपसरपंच शंकर अण्णा रोकडे, पंडित शिवलाल माळी, माजी सरपंच नथू अण्णा चौधरी, गोकुळ रामराव माळी, अन्न रोकडे, महादू पंडित बछे, संजय महाले, भाजपा उपाध्यक्ष गोविंद अण्णा शिरुडे, आबा बछे, सरचिटणीस अमोल चव्हाण, भूषण भाऊ जगताप, सुभाष सोनवणे, विशाल सोनवणे, सुपडू अन्न जाधव, लहानू सोनवणे, रवी शुक्ल, पिंटू रोकडे, शशी रोकडे, जिभाऊ महाले, सागर पाटील, नंदू रोकडे आदी उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, आपला महाराष्ट्र हा संत – समाज सुधारकांची खाण आहे. अश्या या खाणीतला कोहिनूर हिरा म्हणजे क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. शिक्षिका, लेखिका, कवियित्री, माता, समाजसेविका अशा विविध भूमिकेतून सावित्रीबाईंनी समाजातील गोरगरीब, दुर्बल घटकांची सेवा करण्यात आपले सारं आयुष्य पणाला लावलं. त्यांचा आदर्श घेत आजच्या तरुणींनी विविध क्षेत्रात आपले कर्तुत्व सिद्ध करत असून वकृत्व, गीत गायन, रांगोळी स्पर्धांचे माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणींच्या कलागुणांना वाव मिळणार असल्याने त्यांनी स्पर्धेचे आयोजक दिनेश माळी व मित्र परिवाराचे कौतुक केले. तसेच नुकताच विज्ञान दिन आपण साजरा केला, मिनी सायन्स लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविण्यास मदत होईल असा विश्वासही आमदार चव्हाण यांनी व्यक्त केला.