Tuesday, August 11, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हा परिषद शाळांमधील मुलांमधून घडत आहे आपल्या देशाचे उज्वल भविष्य -संपदाताई उन्मेशदादा पाटील यांचे प्रतिपादन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/02/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
जिल्हा परिषद शाळांमधील  मुलांमधून घडत आहे आपल्या देशाचे उज्वल भविष्य  -संपदाताई उन्मेशदादा पाटील यांचे प्रतिपादन

देवळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील स्नेहसंमेलन रंगले :  विदयार्थ्यांनी केले विविध गीते नृत्य सादरीकरण

देवळी ता.चाळीसगाव – (प्रतिनीधी) –  शहरी भागात सुरू असलेले इंग्रजी शाळांमध्ये मुलांना शिकविण्याचा कल ग्रामीण भागात देखील वाढत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुलांना शिकविण्यास पालकांची इच्छा नसते. मात्र ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये देखील आता सकारात्मक बदल घडत आहे . देवळी जीप शाळेतील आज आयोजित सुंदर स्नेहसंमेलन हे एक उत्तम उदाहरण आहे. इंग्रजी शाळांमधून दिला जाणारा संस्काराच्या तुलनेत आजही मराठी जी.प.शाळामधील शिक्षण अधिक सरस आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मूल्य आणि संस्कारासह  विविध गुणात्मक बदल हा कौतुकास्पद असून हे विद्यार्थी उद्याचे उज्वल भविष्य असल्याचे गौरवोद्गार उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या अध्यक्षा संपदाताई उन्मेशदादा पाटील यांनी व्यक्त केले आहे. आज जी.प. प्राथमिक शाळा च्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी सहा वाजता करण्यात आले होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संपदाताई  पाटील बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर पंचायत समितीचे सभापती अजय पाटील, उपसभापती सुनील पाटील, जेष्ठ नेते भैय्यासाहेब काका पाटील,सरपंच  सुनीता अंकुश निकम, उप सरपंच अतुल पाटील, शिक्षक सेनेचे विभागीय अध्यक्ष सिद्धार्थ बागुल,चाळीसगाव पालिकेच्या नगरसेविका गुड्डीताई (सविता) राजपूत,माजी पंचायत समितीचे सदस्य बाजीराव नाना दौड, गस माजी संचालक राजुभाऊ पवार,डॉ. अरविंद पारख, वाल्मिक जाधव, मनोज सूर्यवंशी, शिक्षण विस्तार अधिकारी जि. एस. महाजन, उंबरखेडकेंद्र प्रमुख सुनील पगारे,टाकळी प्र दे केंद्र प्रमुख दिलीप सावंत  आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्याध्यापक विश्वासराव सूर्यवंशी यांनी प्रास्तविकातून स्नेहसंमेलन घेण्यामागचा उद्देश सांगितला. उमंग परिवाराच्या अध्यक्षा संपदा पाटील पुढे म्हणाल्या ग्रामीण भागात जागरूक पालक,तळमळीने शिकविणारे शिक्षक असले की अनेक जी. प. शाळांमधून गुणवान विदयार्थी घडतात. जसे बालपणात आईची कूस पहिले संस्कार विद्यापीठ असले तरी त्यांनतर शिक्षणा सोबत संस्कारांची जबाबदारी शाळेची असल्याने जीप शाळांनी येणाऱ्या स्पर्धेसोबत गुणात्मक बदल करावेत यासाठी भविष्यात जी मदत लागेल त्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी दिली. गुलाबराव पाटील यांनी खुमासदार शैलीत सूत्र संचालन केले. यावेळी शाळेचे विदयार्थी,पालक, माता, भगिनी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

‘स्वराज्यासह राष्ट्राचेही शिवराय हेच जनक’

Next Post

सर्वोदय माध्यमिक विद्यालय सायगाव येथे आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते बक्षीस वितरण

Next Post

सर्वोदय माध्यमिक विद्यालय सायगाव येथे आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते बक्षीस वितरण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo