<
जळगाव – (प्रतिनिधी) – येथील शाळेत राष्ट्रीय विज्ञानदिन निमित्ताने दि.२८/०२/२०२० (शुक्रवार) रोजी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या विज्ञान प्रयोगांचे प्रदर्शन भरविले.उपक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून म.न.पा.केंद्र शाळा क्रमांक-०९ चे केंद्रप्रमुख डॉ. अशोक सैंदाणे, मु.जे.महाविद्यालयाच्या शालेय विभागाचे शिक्षण समन्वयक श्री.चंद्रकांत भंडारी, किलबील बालकमंदिराच्या मुख्याध्यापिका सौ.मंजुषा चौधरी, शाळेचे मुख्याध्यापक डॉ. रवींद्र माळी व श्री.नीलेश नाईक इ.मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भारताचे थोर शास्त्रज्ञ व माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर इ.५ वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांनी ” डोळे उघडून बघा मुलांनो ” .व इ.८ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांनी “सायन्स का चमत्कार ‘ ही विज्ञानगीते सादर केली. तसेच हर्षल माळी, विशाल सैनी, प्रतिभा डोखे व हर्षदा बेलदार या विद्यार्थ्यांनी विविध शास्त्रज्ञांचे कार्य वक्तृत्वामधून सांगितले.
त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विज्ञान प्रयोग प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. इ.४ थी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांनी सौरऊर्जा वापर,ध्वनी-जल-वायु प्रदूषण, स्मार्ट सिटी असे अनेक प्रयोग प्रात्यक्षिक सादर केली.
तसेच ज्युनिअर बालवाडी ते इ.९ वी च्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूपासून शोभेच्या टिकाऊ वस्तू तयार केल्या होत्या. त्या वस्तूंचेही प्रदर्शन भरविण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी फ्लाँवर पाँट, फोटो फ्रेम, वाँल हँगिंग, नारळाच्या करवंटीपासून शोभेच्या वस्तू व पायदान अशा विविध शोभेच्या वस्तू तयार केल्या होत्या. सदर प्रदर्शनातील वस्तूंचे परिक्षण ज्योती सपकाळे, उज्ज्वला जाधव व संगिता निकम यांनी केले. प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
उपक्रम नियोजन ज्योती सपकाळे, वंदना नेहेते व सुवर्णा सोनार यांनी केले. सूत्रसंचालन आदित्य माळी व भावेश पाटील या. इ.९ वी च्या विद्यार्थीमित्रांनी केले. सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.