<
लॉन्चिंग सोहळ्यास ग्राहकांचा उस्फुर्त प्रतिसाद….
जळगाव-(प्रतिनिधी)-BS – VI प्रणालीच्या ५ गाड्यांचा लॉन्चिंग सोहळा सरस्वती फोर्डच्या प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात शहरातील मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. तसेच मोठ्या संख्येने ग्राहकांची व जळगाववासीयांची उपस्थिती लाभली. महत्वाचे म्हणजे लॉंचिंगच्या वेळेलाच ३ कार्सची बुकिंगही झाली. या वेळी मा. आमदार सुरेश(राजूमामा) भोळे, उप. प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. किरण मोरे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली.
“फोर्डच्या सर्वच गाड्या अत्यंत आकर्षक, सुंदर, आरामदायी असून सुरक्षितता हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.” असे गौरवोदगार काढून फोर्ड परिवाराच्या पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्यात.
नवीन BS -६ प्रणालीच्या कार्सची काही खास वैशिष्ठे:-
BS –VI हि प्रणाली पर्यावरणपूरक असून कारप्रेमी चालकांसाठी नवीन अनुभव व नवीन उंची प्राप्त करून देते या प्रणाली मध्ये कॅथलिक कॅनव्हर्टर असून कारला स्मूथनेस प्राप्त करून देते तसेच या प्रणालीमुळे कारमधील केबिन नॉईस व व्हायब्रेशन कंट्रोल करून नवीन आनंद देते. तसेच यामुळे पर्यावरणाला होणाऱ्या प्रदूषणाला सुद्धा आळा बसेल.
BS –VI प्रमाणित कार्स या सक्षम व परिपूर्ण अशा १.२ प्रति लिटर ९६ पी.एस.पॉवर एवढी उच्च क्षमता पेट्रोल व १. ५ टी. डि. सी. आय. डिझेल इंजिन १०० पी. एस. पॉवर अशा दोन ऑप्शन मध्ये उपलब्ध असून वेळोवेळी नावीन्यतेचा अनुभव करून देत असते. व न्यू फोर्ड इंडिव्हर २.० इको-ब्लु डिझेल वेरिएन्ट १७० पी. एस. पॉवर एवढ्या उच्च क्षमतेच्या इंजिनसह १० स्पीड ऑटोमॅटिक गेयर सह उपलब्ध असून शक्तिशाली इंजिन चा अनुभव करून देते. तसेच या मध्ये नवीन “Fordpass Application” द्वारे आपण आपली कार मोबाइलवरून लॉक / अनलॉक करणे लोकेशन ट्रेस करणे, कारची स्पीड तपासणे, मोबाइल द्वारे आपली कार स्टार्ट आणि स्टॉप करणे (ऑटोमॅटिक कार करिता), टचस्क्रीन इंफोटेंमेंट, नेव्हिगेशन, ऑटोमॅटिक हेडलॅम्प, इलेक्ट्रॉनिक मिरर, रेन सेन्सिंग वायपर्स अशा एक ना अनेक कधीही न बघितलेल्या फीचर्स चा समावेश या प्रणाली मध्ये केलेला आहे.
सुरक्षितता:-
फोर्ड कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांच्या सुरक्षिततेचा विचार करत असते म्हणूनच कार्स मध्ये ६ एअर बॅग्स व इमर्जन्सी असिस्ट असून फक्त चालकाचं नव्हे तर कारमध्ये बसलेल्या प्रवाशांनासुद्धा सुरक्षितता प्राप्त करून देते. ऍक्टिव्ह रोल प्रोटेक्शन (ARP), इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), कार रोल होऊन अपघात होऊ नये म्हणून (HLA), तसेच न्यू इंडिव्हर मधील टेरेन मॅनेजमेंट सिस्टीम ची फीचर्स थक्क करणारी आहेत.
बी.एस. VI प्रणालीमध्ये किमतीचा बाबतीतही बी. एस. IV च्या तुलनेत बराच फरक असून सामान्य ग्राहकाला परवडेल अशा किमतीत उपलब्ध असून न्यू फोर्ड फिगो ५,३९,०००, न्यू फोर्ड अस्पायर ५,९९,००० न्यू फोर्ड फ्रीस्टाईल ५,८९,०००, न्यू फोर्ड इकोस्पोर्ट ८,०४,०००, न्यू फोर्ड एन्डेव्हर २९,५५,००० सुरवात पासून पुढे अशा किमतीत उपलब्ध आहे.
सरस्वती फोर्ड हे गेल्या चार वर्षापासून दिवसेंदिवस प्रगतीचे शिखर गाठत असून, आज फोर्ड परिवारात दोन हजाराहून अधिक ग्राहकांची भर पडली आहे.
१९५१ मध्ये नवीपेठ जुन्या कन्या शाळेच्या गल्लीत, सरस्वती डेअरी नावाचे छोटेसे रोपटे लावले तो आज सरस्वती डेअरी, सरस्वती फोर्ड व सरस्वती एन्टरप्राईजेस मिळून “महाकाय वृक्ष” बनला आहे.
धवल टेकवानी याना मागील वर्षी फक्त जळगावातच नाही तर अक्ख्या महाराष्ट्रात प्रतिष्ठित ओळखल्या जाणाऱ्या प्राऊड महाराष्ट्रीयन अवॉर्ड, व तसेच कन्झ्युमर किंग अवॉर्ड ने सन्मानित केले गेले. तसेच फोर्डच्या श्रेष्ठ अशा समजल्या जाणाऱ्या “फोर्ड प्रेसिडेंट” अवॉर्डने सुद्धा धवल टेकवानी याना गौरविण्यात आलेले आहे. संपूर्ण भारतात ३०० हुन अधिक डीलर्स असून त्यापैकी ८ डीलर्स मध्ये सरस्वती फोर्ड ची निवड होते. ग्राहकांच्या सेवेसाठी सरस्वती फोर्ड नेहमीच सज्ज असून त्यांच्या संतुष्टीची व सोयी-सुविधांची नेहमीच दाखल घेतली जाते. नेहमी मिळत आलेला ग्राहकांचा प्रतिसाद यावेळी सुद्धा मिळेल असा विश्वास सरस्वती फोर्ड च्या संचालकांनी व्यक्त केला.