Tuesday, August 11, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘फिक्की’च्या राष्ट्रीय परिषदेत जैन इरिगेशनचा दिल्लीत गौरव

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/03/2020
in राष्ट्रीय, विशेष
Reading Time: 1 min read
‘फिक्की’च्या राष्ट्रीय परिषदेत  जैन इरिगेशनचा दिल्लीत गौरव

एफआयसीसीआयतर्फे आयोजित परिषदेमध्ये कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव अलका भार्गव यांच्याहस्ते प्रमाणपत्र स्विकारताना जैन इरिगेशनच्या व्हाईस प्रेसिडेंड डॉ. संगिता लढ्ढा. सोबत व्यासपीठावर जलशक्ती मंत्रालयाचे सचिव यू. पी. सिंग आदि

पाणी कार्यक्षमतेने वापराच्या तंत्रज्ञानामुळे सन्मान

दिल्ली-(प्रतिनिधी)- इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री संस्थेतर्फे ‘फिक्की’ अर्थात एफआयसीसीआय, फेडरेशन हाऊस, नवी दिल्ली येथे 26 फेब्रुवारी रोजी ‘शेतीत शाश्वत पाणी वापर व्यवस्थापनाद्वारे भविष्यातील गुंतवणूक’ या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेमध्ये जैन इरिगेशनला शाश्वत पद्धतीने पाण्याचा कार्यक्षमतेने वापर केल्याबद्दल गौरविण्यात आले. पंजाबमधील होशियारपूर कंदी प्रकल्प सौर तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक जलसंसाधन व्यवस्थापनाद्वारे यशस्वीपणे कार्यान्वित करण्यात आलेला आहे. या प्रकल्पाचा केस स्टडी असलेल्या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमास कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव अलका भार्गव, जलशक्ती मंत्रालयाचे सचिव यू. पी. सिंग हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांच्याहस्ते जैन इरिगेशनच्या वतीने व्हाईस प्रेसिडेंड डॉ. संगिता लढ्ढा यांनी प्रमाणपत्र स्विकारले. जैन इरिगेशनचे ‘पाणी थेंबाने पीक जोमाने’ हे ब्रिद परिषदेचे ध्येय होते. परिषदेत पाणी बचतीचे तंत्रज्ञान, त्याचा शेतीतील वापर आणि आव्हाणे, शाश्वत पाणी वापराच्या पद्धतीत एकात्मीक दृष्टीकोन या विषयांवर विचार मंथन झाले. परिषदेत पाण्याच्या वापराची कार्यक्षमता वाढविणे आणि ठिबक सिंचनाचा वापर करणे यावर भर देण्यात आला. हे तंत्रज्ञान जैन इरिगेशनच्या ‘संशोधन आणि विकास’ विभागाने नाविन्यपूर्ण पद्धतीने विकसीत केले आहे. ‘रिसोर्स टू रूट’ ही एकात्मिक सिंचन पद्धतीचा विकास जैन इरिगेशनने केलेला असून यातून पाणी वापराची कार्यक्षमता वाढते.

जैन इरिगेशन व्यतिरिक्त या राष्ट्रीय परिषदेत इस्त्रायलच्या राजदूत कार्यालयातील अधिकारी, निती आयोगातील अधिकारी, जलसंसाधन मंत्रालयाचे अधिकारी, कॉर्टेवा अॅग्री सायन्स, ओलम, रिव्ह्यूलीस, टॅफे, डीएससीएल, आयसीआरआयईआर (इक्रीअर), इक्रीसॅट, दालमिया भारत फाउंडेशन आदींचे प्रतिनिधी सहभागी होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ऍक्युपंक्चरचा प्रचार व प्रसार व्हावा याकरिता शासन प्रयत्नशील;ऍक्युपंक्चर थेरपी शिकण्यासाठी पुढे यावे-प्रतिभा कोकंदे

Next Post

लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड रेली;महिला आणि युवतींची ३ मार्च रोजी रेली

Next Post
लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड रेली;महिला आणि युवतींची ३ मार्च रोजी रेली

लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड रेली;महिला आणि युवतींची ३ मार्च रोजी रेली

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo