<
मुक्ताईनगर दि.4 (वार्ताहर) — सी.ए. ए., एन. आर .सी., एन पी आर तसेच ईव्हीएम यांचा विरोध म्हणून बहुजन क्रांती मोर्चा तर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी 11 वाजेपासून ते दुपारी चार वाजेपर्यंत मुक्ताईनगर येथील तहसील कार्यालयासमोर बहुजन क्रांती मोर्चा तर्फे एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते .त्या निमित्ताने नायब तहसीलदार प्रदीप झांबरे यांना निवेदन देण्यात आले तसेच त्यानंतर पोलिस निरीक्षक यांनाही निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की , भारतातील नागरिकांचे नागरिकत्व हिरावून घेणाऱ्या एन पी आर तसेच एन आर सी आणि सी ए ए यांच्या विरोधात जनआंदोलन उभे राहिले असून जनमानसात याविषयी मोठा संताप व आक्रोश केला जात आहे. देशाचे धर्माच्या नावावर तुकडे केले जात असून त्यामुळे संविधानात असलेल्या धर्मनिरपेक्षतेची ओळख नष्ट केली जात आहे केंद्र सरकारने भारतीय नागरिकांच्या व बहुजनांच्या विरोधातील कायदे पारित करून आणीबाणीची परिस्थिती निर्माण केलेली आहे ओबीसींची जातिनिहाय जनगणना न करता बहुजनांच्या अहिताचे निर्णय घेतले जात आहेत इतकेच नव्हे तर महिलांवर दिवसेंदिवस अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे तसेच सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची सर्रास विक्री सुरू केलेली असून खासगीकरणाचा घाट घातला जात आहे तसेच निवडणुकीत घोटाळा होत असतानासुद्धा ईव्हीएम यंत्राचा वापर मतदानासाठी केला जात आहे याच्या विरोधात आज मुक्ताईनगर येथील तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळेस क्रांती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा चे तालुकाध्यक्ष प्रमोद सौंदळे भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष राजू वानखेडे बहुजन मुक्ती पार्टी चे ब्रिजलाल इंगळे मनोज पोहेकर राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष अरुण जाधव राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुकाध्यक्ष जुबेर अली, शहर प्रमुख इरफान बागवान, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे शेख अजगर तसेच अकील शेख हाफिस जावेद , शिवसेनेचे अफसर खान, पवन सोनवणे ,प्रकाश गोसावी , राष्ट्रवादी काँग्रेसचे पवनराजे पाटील तसेच सिद्धार्थ वाघ ,भास्कर पाटील , निखिल पोहेकर, जगदेव वानखेडे, माणिक बेलदार , भाऊराव सुरवाडे , हमीद चौधरी यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.