<
जळगाव : शहरातील आदर्श माहेश्वरी महिला मंडळातर्फे होळी उत्सवानिमित नैसर्गिक फुलांची होळी खेळण्याचा उपक्रम घेण्यात आला. यावेळी विविध नृत्य व खेळांमध्ये महिला सभासदांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
मेहरूण तलावाच्या किना-यावर असणा-या सिद्धार्थ फार्म हाउसवर हा कार्यक्रम पार पडला. यासाठी प्रभा रायसोनी यांनी सहकार्य केले. यावेळी सभासदांसाठी पंजाबी हि थीम ठेवण्यात आलेली होती. पंजाब प्रांताप्रमाणे पेहराव करून पंजाबी गीतांवर सभासदांनी जल्लोष केला. तसेच, विविध गीतांवर नृत्यदेखील सादर केले. प्रसंगी संगीतखुर्ची आणि इतर विनोदी खेळांमध्ये महिलांनी सहभाग घेतला. यानंतर नैसर्गिक फुलांची होळी खेळण्यात आली.
यावेळी अध्यक्षा मनीषा तोतला, सचिव अमिता सोमाणी यांनी होळी उत्सवाविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी उत्कृष्ट पेहराव हा सन्मान पूजा जाखेटे, अश्विनी मुंदडा, मधु तापडिया यांना मिळाला. कार्यक्रमाचा ११० महिलांनी लाभ घेतला. सोनाली जाजु, सुधा मंडोरा, स्वाती सोमाणी, तृप्ति काबरा, विद्या तोतला, मनिषा मणियार, शुभांगी काबरा, सुरेखा न्याती, सारिका कोगटा, सीमा राठी, सीमा दहाड़, प्रीति लाठी, शिल्पा काबरा, मोना बलदवा, सुवर्णा मुंदडा, शितल मंत्री, प्रणाली देवपुरा, प्रिया दहाड, स्वाती लाठी, सोनाली काबरा, सुनिता मणियार, अरुणा मंत्री, सुरेखा मन्डोरा, दुर्गा मंडोरा, शोभा राठी, लतिका मंत्री, सुचिता लढढा, राणी लाहोटी यांच्यासह कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी अध्यक्ष, कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले.