<
जळगाव : येथील आदर्श माहेश्वरी महिला मंडळातर्फे सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून जागतिक महिला दिनानिमित्त १० गरजू महिलांची डोळ्यांची मोतीबिंदू तपासणी व ऑपरेशनचे नियोजन करण्यात आलेले आहे. यासाठी ९ मार्चपर्यंत नावनोंदणीचे आवाहन करण्यात आले आहे.
जागतिक महिला दिन हा महिलांसाठी महत्त्वाचा दिवस असतो. यादिवशी समाजातील गरजू महिलांसह इतर महिलांची मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी डॉ. शीतल अग्रवाल यांचे सहकार्य लाभणार आहे. ज्यांना नावनोंदणी करायची आहे त्यांनी सुवर्णा मुंदडा (९८५०८४२३६१), अरुणा मंत्री (९८६०७०५१४७) यांचेशी अथवा प्रियंका आईस्क्रीम पार्लर, ओंकारेश्वर मंदिरसमोर येथे नावे द्यावी असे आवाहन अध्यक्षा मनीषा तोतला, सचिव अमिता सोमाणी यांनी केले आहे.