<
कुसुंबा/जळगांव(प्रतिनीधी)- येथील श्री स्वामी समर्थ प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात जागतिक महिला दिना निमित्त मुलाखत महाराष्ट्रच्या लेकीची या उपक्रमा अतंर्गत विद्यालयातील महिला शिक्षकांची विद्यार्थीनीने महिलाचा संघर्ष व स्वाभिमान या विषयावर मुलाखत घेण्यात आली.
या वेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तथा संचालिका कु. प्रतिक्षा पाटील, दिपाली भदाणे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. सुरवातीला कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका कु. प्रतिक्षा पाटील यांची मुलाखत इ.७ वीची कु.वैष्णवी इखे विद्यार्थीनी प्रश्न विचारत बालपण, शैक्षणिक जीवन, मुख्याध्यापक पदाचा अनुभव व स्वप्न या मुद्दयाच्या आधारे जीवनातील स्वाभिमानाला उजाळा दिला. सदर कार्यक्रमात १२ महिला शिक्षकाची मुलाखत घेण्यात आली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कामिनी पाटील यांनी केले.