<
कासोदा ता.एरंडोल ( सागर शेलार ) :- येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांना गावातील समस्यांचे लेखी निवेदन सादर.
सविस्तर वृत्त असेकी काल दि. ७ मार्च रोजी जिल्हाधिकारी डॉ. अविनाशजी ढाकणे व मुख्यकार्यकारी अधिकारी , डॉ. बी.एन.पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभर सर्वच शाळेना संरक्षक भिंत बांधणे कामी कासोद्यात सर्व प्रथम कामाचे उद्घाटन व भूमिपूजन आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले . त्यावेळी तालुका व जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. त्याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा , उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे , जिल्हाअध्यक्ष प्रविण सपकाळे , महिला जिल्हा अध्यक्ष नाजनीन शेख यांच्या सहमतीने व साप्ताहिक विचार वैभव वृत्तपत्राच्या टीम ने जिल्हाधिकारी डॉ.अविनाशजी ढाकणे , व मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांना लेखी निवेदन दिले. निवेदनात कासोदा येथील लोकसंख्या ३५००० च्या वर व भल्यामोठ्या बाजारपेठेचे गाव असूनही बसस्टॉप नाही.कासोदा व परिसरातील महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी , विध्यार्थीनी व गावातील व परिसरातील ग्रामस्थ कासोदा येथूनच ये – जा करत असतात. परंतु कासोद्यात बस स्टॉप नसल्यामुळे विद्यार्थी व परिसरातील सर्व ग्रामस्थ बसस्टॉप परिसरातील दुकानंसमोर उभे राहतात , व मोठ्या प्रमाणात गर्दी होते व वाहतुकीसाठी अडचण निर्माण होते. त्यामुळे बऱ्याच बसेस गावात न घुसता बाहेरूनच निघून जातात. तसेच येवढ्या मोठ्या गावाच्या पोलीस स्टेशनला संरक्षण भिंत , व पोलीस कर्मचारी यांना राहण्यासाठी पो.स्टे. च्या आवारात पोलीस क्वॉटर देखील नाही.कासोदा हे गाव हिंदू – मुस्लिम गाव असून अनावधानाने काही घटना घडली व त्याचे पडसाद जर वाईट घडले तर त्यास जबाबदार कोण ? अशी चर्चा गावातील ग्रामस्थ करीत आहेत.जर जमाव जादा प्रमाणत पोलिस स्टेशन वर चालून आला तर पोलिस स्वतःचे देखील रक्षण करू शकतील व जमाव आटोक्यात आनण्यास देखील मदत होऊ शकते. म्हणून कासोदा पोलीस स्टेशनला संरक्षण भिंत व मोठे गेट लावण्यात यावे यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व साप्ताहिक विचार वैभव वृत्तपत्राच्या पदाधिकारी यांनी निवेदन दिले. त्याप्रसंगी एरंडोल ता.अध्यक्ष सागर शेलार , पत्रकार राहुल मराठे , पत्रकार वासुदेव वारे , पत्रकार संघाचे आदी पदाधिकारी उपस्थित होते.