<
नांद्रा/पाचोरा(प्रतिनिधी)- येथील क्रिएटिव्ह इग्लीश स्कूल येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला पालक वर्ग यांच्या साठी दैनंदिन धावपळीतून विरंगुळा म्हणून चला खेळ खेळू या…भरघोस बक्षिसे जिंकू या…जागर स्ञी शक्तीचा घालू या अशा विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे संगीत खुर्ची, प्रश्नमंजुषा, लिंबू चमचा भाषण उखाणे व हळदीकुंकू कार्यक्रम अशा विविध स्पर्धात्मक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाद्वारे भरघोस बक्षिसे व पैठणी साडी व स्मृतिचिन्ह देऊन महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रम चे उद्घाटन उपसरपंच कल्पना बालु बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षांमध्ये घेतलेल्या स्पर्धांमध्ये गुणवंत विद्यार्थी व वार्षिक स्नेहसंमेलनात सहभाग नोंदवलेले सर्व विद्यार्थ्यांना स्मृती चिन्ह व गोल्ड मेडल देऊन गौरवण्यात आले. बांबरुड, कुरंगी, माहिजी, वरसाडे, आसनखेडे, पहान, नांद्रा, लासगाव, येथील आलेल्या सर्व महिला भगीनी यांना प्रत्येकाला भेटवस्तू व विजेते महिलांना घरगुती वापरातील साहित्य बक्षिसे देऊन सन्मान करण्यात आला. परिसरातून मोठ्या संख्येने महिला पालक वर्ग उपस्थित होत्या. कार्यक्रमाचं प्रास्ताविक उज्वला महाले व सूत्रसंचालन अरुंधती राजेंद्र यांनी तार आभार प्राध्यापक यशवंत पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मनीषा बडगुजर, नम्रता पवार, हिना पाटील, पूजा सोनजे, दीपाली मोरे, प्रेरणा पाटील यांनी परिश्रम घेतले.