<
जळगाव(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्या नोंदणीकृत शिक्षकहित व समाजहित जोपासणाऱ्या संघटनेचे पहीले ऐतिहासिक राज्य अधिवेशन व राज्य स्तरीय शिक्षण परीषद दिनांक 11 मार्च 13 मार्च रोजी यशवंतराव चव्हाण(इनडोअर) सभागह, सन्मित्र कॉलनी, औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आले होते. या पहीले राज्य अधिवेशनाकरीता सहभागी होणाऱ्या राज्यातीलशिक्षकांना राज्य शासनाने विशेष कर्तव्य रजा मंजुर केली होती. (संदर्भ – संकीर्ण -२०२०/प्र.क्र.३७/टिएनटी-१ दिनांक २८ रोजी स्वप्निल कापडणीस, अवर सचिव यांचे पत्र) या अधिवेशनानिमित्त सर्वांना प्राप्त झाले होते. परंतु कोरोनोमुळे आरोग्यमंत्र्यांनी राज्य अधिवेशनाला स्थगिती दिली. असून आता हे अधिवेशन पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आले आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव किशोर पाटील कुंझरकर यांनी राज्याध्यक्ष अरुणराव जाधव यांचे सूचनेवरून दिली. राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या घटकांकडून महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे छत्रपती राजर्षी शाहु महाराज / राजमाता जिजाऊ / सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय समता पुरस्कार साठी प्रस्ताव मागितलेले होते. सदरील प्रस्तावांची विभागातील अंतीम यादी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्यमहासचिव यांनी जाहीर केली असुन सदरील राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा अधिवेशानाला निमंत्रित करणाऱ्यात आलेले मान्यवर सर्व पक्षीय मंत्री महोदय व लोक प्रतिधिनी व राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा.वर्षाताई गायकवाड तसेच शिक्षक संघटनांचे राज्य समन्वय समितीचे राज्याध्यक्ष अर्जुनराव साळवे, समता शिक्षक संघाचे राज्याचे राज्याध्यक्ष श्री.अरुणराव जाधव, राज्यमहासचिव किशोरपाटील कुंझरकर आदीच्या उपस्थित दिनांक १२ मार्च२०२० वार – गुरुवार यशवंतराव चव्हाण (इनडोअर) सभागह, सन्मित्र कॉलनी, औरंगाबाद येथे देण्यात येणार होते. परंतु आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांनी कोरोनो मुळे कार्यक्रम स्थगित केला. आरोग्य मंत्र्यांच्या स्थगिती मुळे आता पुढील आदेशापर्यंत अधिवेशन व राज्यपुरस्कार वितरण सोहळा कोरोनामुळे स्थगित करण्यात आला आहे. पुढे जेव्हा तारीख मिळेल तेव्हा देण्यात येणार आहे असे जाहीर करण्यात येत आहेत. तरी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव किशोर पाटील कुंझरकर यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.