<
जळगाव – (प्रतिनिधी) – क ब चौ उ म वी समाजकार्य विभाग राष्ट्रीय सेवा योजना आज टहाकळी येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना कोरोना विषाणू मार्गदर्शन जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना मार्गदर्शन करतांना कोरोना विषाणू संसर्ग बाबत उपाययोजना करण्यासंबंधीत जन-जागृती केली.स्वत:चे आणि इतरांचे आजारी पडण्यापासून संरक्षण करण्यासाठी स्वच्छतेचा संदेश विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना देण्यात आला. तसेच लक्षणे आढळून आल्यास बेजबाबदार वागू नये लागलीच शासकिय रुग्णालयात संपर्क साधावा असे सांगितले. कोरोना विषाणू काय आहे? परदेशात लागण झालेला विषाणूचा फैलाव जोमाने आपल्या देशात व राज्यात पसरत असल्याचे दिसत आहे.तर शाळेतील विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना त्यापासून संरक्षणासाठी व त्याची लागण होऊ नये यासाठी ची काळजी कशी घ्यावी तसेच त्याची लक्षणे या बाबत सविस्तर माहिती दिली या बद्दल अधिकृत माहिती चा आधार घ्यावा. व अफवांवर विश्वास न ठेवता अफवांपासून लांब राहण्याचा संदेश दिला.
या अभियानासाठी आरोग्य उपकेंद्र दोनगाव बु. येथील आरोग्यसेवकांचे मार्गदर्शन लाभले.