<
धरणगाव येथे विशेष कर्तुत्वान महिला सन्मान सोहळ्याचं आयोजन
धरणगाव(प्रतिनिधी)- आजच्या राष्ट्राच्या उन्नती मध्ये पुरुषांबरोबरच महिलांचाही महत्त्वाचा वाटा असून केवळ मुलींच्या संस्काराबरोबर मुलांनाही संस्कार देणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ज्योती महाजन यांनी केले. धरणगाव येथे कर्तव्य बहुद्देशीय संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त शहरासह परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धरणगाव सीनियर कॉलेजच्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती महाजन होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून गोल्ड मिडीलिस्ट मनीषा पाटील, ज्युनिअर कॉलेजच्या प्रा. कविता महाजन, ॲड.स्वाती निकम जळगाव, डॉ.छाया बोरसे वैद्यकीय अधिकारी साळवा, प्रतीक्षा मनोज पाटील संचालिका श्री स्वामी समर्थ ग्रुप जळगाव, सुरेखा चौधरी संचालिका कर्तव्य बहुउद्देशीय संस्था धरणगाव ,पाकिजा पटेल राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षिका धरणगाव, अर्चना सूर्यवंशी चेअरमन इंग्लिश स्कूल पाळधी, अँड. कृतिका बाजपेयी धरणगाव, वैशाली पवार चेअरमन गुरुकुल स्कूल धरणगाव, चैताली रावतोळे मुख्याध्यापिका गुड शेफर्ड इंग्लिश मीडियम धरणगाव, प्रतिभा चौधरी लिटल ब्लॉसम धरणगाव, नेहा गुप्ता संचालिका बी आर्के टेक क्लास धरणगाव आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैशाली पवार यांनी केले यावेळेस सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, जिजामाता, रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली, धरणगाव व परिसरातील तसेच जिल्ह्यातील विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर कर्तव्य बहुद्देशीय संस्थेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा देऊन गौरवण्यात आले. मनोगत म्हणून अँड.स्वाती निकम प्रा.कविता महाजन ,प्रतिभा पाटील, पाकिजा पटेल, अँड. कृतिका बाजपेयी महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमाच्या प्रती आदर व्यक्त करून संस्थेचे व आज आयोजकांचे आभार मानले. यावेळी साक्षी बोरसे, हर्शिका गुप्ता, स्नेहल पाटील, भारती महाजन, माजी नगराध्यक्ष उषा वाघ, सुरेखा महाजन, शोभा ठाकरे, प्रियंका कंखरे, प्रेरणा मराठी योगेश्वरी मराठी या महिलांचा पुस्तके व प्रतिमा भेट देऊन विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुनील पंढरीनाथ चौधरी, ए.के. पाटील, बि.आर.महाजन, आत्माराम चौधरी, छाया चौधरी, अरविंद चौधरी, डॉक्टर रोहिणी, शिंदे हे लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाजनीन कयूम शेख यांनी केले, तर आभार सुरेखा चौधरी यांनी मानले.