<
जळगाव-(प्रतिनिधी) – अवयव दानाचा संदेश प्रभावीपणे देण्यासाठी, समाजमनात अवयव दानाचे महत्त्व रुजविण्यासाठी आणि अवयव अभावी खडतर आयुष्य जगत असलेल्या असंख्य रुग्णांच्या मनात आशेची किरण जागविण्यासाठी जागतिक किडनी दिनानिमित्त आयोजित “आॕर्गन डोनेथाॕन” या मॕरेथाॕन मध्ये तरुणाई आणि अन्य नागरिक सहभागी होत आहेत.
छाया किडनी केअर अॕण्ड रिलीफ फाऊंडेशन, सुखकर्ता फाऊंडेशन व आनंद डायलिसीस अॕण्ड सुपर स्पेशालीटी किडनी केअर युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने आणि स्कुल आॕफ मॕनेजमेंट स्टडीज, नॕशनल सर्विस स्कीम तसेच स्टुडंट डेव्हलपमेंट विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व दारा अॕडव्हायजरी सर्विसेसच्या संयुक्त सहकार्याने उद्या दि. 13 मार्च रोजी सकाळी 7 वा. विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात ही मॕरेथाॕन पार पडणार आहे. 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटर अशा दोन प्रकारात ही मॕरेथाॕन होणार आहे. विद्यापीठातील विविध विभागातील तसेच शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, विद्यापीठातील स्टाफ व कर्मचारी त्याचप्रमाणे विविध संस्था आणि अन्य सामान्य नागरिकांचा यात सहभाग असणार आहे. या मॕरेथाॕनमध्ये धावण्यासाठी तरुणाई मध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत असून अन्य नागरिक देखील आनंदाने व स्वयंस्फुर्तीने या समाजोपयोगी उपक्रममात सहभाग घेत आहेत. आॕर्गन डौनेथाॕनची तय्यारी अंतिम टप्प्यात आली असून विद्यार्थी, क्रीडाप्रेमी या मॕरेथाॕन रनसाठी सज्ज आहेत.
जिंदगी मिलेगी दोबारा….
काही वर्षांपूर्वी जिंदगी ना मिलेगी दोबारा हा सिनेमा आला होता. तरुणाईमध्ये हा सिनेमा आजही तितकाच लोकप्रिय आहे जेवढा तेव्हा होता. आॕर्गन डोनेथाॕनमध्ये तरुणाईचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असल्याने या सिनेमाच्या टायटल मधील ना हे अक्षर काढून अवयव दानाद्वारे आयुष्य पुन्हा जगता येईल हा संदेश जिंदगी मिलेगी दोबारा या स्लोगनद्वारे देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
अवयव दान…काळाची गरज…
बदलत्या आणि ताण-तणावपूर्ण जीवनशैलीमुळे भारतासह जगभरात अवयव निकामी होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अवयव दाते आणि अवयव निकामी झालेले रुग्ण यांतील दरी खुप मोठी आहे. त्यामुळे समाजात अवयव दानाविषयी जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे किंबहुना हि काळाची गरज आहे. भारतात आजही अवयव दानाचे प्रमाण अन्य विकसित देशांच्या तुलनेने अतिशय अल्प आहे. छाया किडनी केअर अॕण्ड रिलीफ फाऊंडेशन, सुखकर्ता फाऊंडेशन आणि आनंद डायलिसीस अॕण्ड सुपर स्पेशालिटी किडनी केअर युनिट संयुक्तपणे या विषयावर कार्य करीत आहे. आॕर्गन डोनेथाॕन हा उपक्रम त्याचाच एक भाग आहे. समाजातील अन्य घटक देखील या विषयाला घेऊन आता संवेदनशील झालेले आहेत आणि म्हणूनच या उपक्रमाशी ते जुळले आहेत.
या समाजोपयोगी उपक्रमात जास्तीतजास्त लोकांनी सहभागी व्हावे असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे. या वेळी छाया किडनी फाऊंडेशनचे किशोर सुर्यवंशी, सुखकर्ता फाऊंडेशनचे डाॕ. नरेन्द्र ठाकुर, आनंद डायलिसीस सेंटरचे डाॕ. अमित भंगाळे, स्कुल आॕफ मॕनेजमेंटचे संचालक डाॕ. अनिल डोंगरे, दारा अॕडव्हायजरी सर्विसेसचे पंकज दारा, छाया किडनी फाऊंडेशनचे सौ. दिपाली नाईक सौ. लीना लेले, मुसा शेख, दिव्या अग्रवाल यांची उपस्थिती होती. सदर मॕरेथाॕनमध्ये सहभागी होण्यासाठी 9767471357, 9922100500 या क्रमांकांवर संपर्क साधावा.