<
जळगांव(प्रतिनिधी)- स्वप्नसाकार फाऊंडेशन संचालित हेल्थ प्लस इन्स्टिटयूटच्या वतीने जागतिक महिला दिन निमित्ताने मेडिकल सह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शीतल भोसले यांच्या हस्ते सर्व प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. डॉ. स्वाती सोनवणे यांनी महिला विशेष दिना निमित्ताने मार्गदर्शन केले. तसेच १०० परिचारिकांना स्मुतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. श्री. समर्थ शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षाली पाटील, सरस्वती विद्या मंदिरच्या आदर्श शिक्षिका सुवर्णलता अडकमोल, नोबल इंग्लिश स्कूलच्या संचालिका अर्चना सूर्यवंशी,बुशरा फाऊंडेशनच्या बुशरा शेख, अभेद्य फाऊंडेशनच्या वैशाली झाल्टे, महिला पोलिस पळसकर यांचा श्रीशक्ती पुरस्काराने डॉ शीतल भोसले यांचा हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ.स्वाती सोनवणे, डॉ नलिनी महाजन, रेमंडचे सुनील पाटील, स्वप्न साकार फाऊंडेशनच्या अध्यक्षा भारती काळे उपस्थित होते. राकेश कंडारे, गणेश जोशी यांचे सहकार्य लाभले.