<
जळगांव(प्रतिनीधी)- येथील नेहरू युवा केंद्र मार्फत शहरात ठिकठिकाणी जनजागृती बॅनर लावण्यात आले. यात प्रामुख्याने बस स्टँड, कलेक्टर ऑफिस, रेल्वे स्टेशन परिसर आणि गर्दीची ठिकाणी पोस्टर लावून जनजागृती अभियान नेहरू युवा केंद्रामार्फत राबवीले गेले. तसेच नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. या प्रसंगी गौणखनिज उपजिल्हाधिकारी दिपक चव्हाण, तुळजाई फाऊंडेशनचे अध्यक्ष भुषण लाडवंजारी, पत्रकार संघाचे विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, सत्यमेव जयतेचे मुख्य संपादक दिपक सपकाळे, चेतन निंबोळकर, विनोद पाटील, विकास वाघ आदी उपस्थित होते.