जळगांव(प्रतिनीधी)- येथील दिव्या यशवंत (उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस युवती समन्वयक) यांनी काल थेट विधानभवनात धडक देत केंद्रीय जलसंपदा मंत्री मा.जयंत पाटील यांची भेट घेऊन गावातील २० वर्षं रखडलेल्या “सुतार बर्डी” धोरणासंदर्भात निवेदन दिले आणि ह्या धरणाचे काम तात्काळ सुरू करुन ते ह्याच वर्षी पुर्ण करण्याचा हमीचा शब्द मा.मंत्रीमहोदयां कडून घेत, साकडं घातलं. तसेच गावातील समिधा विकास फाऊंडेशने आजतागायत प्रशासन दरबारी घेतलेल्या लेखी पाठपुराव्याची संपूर्ण माहिती देत, आमडदे गावासोबतच इतर गावांसाठी “सुतार बर्डी” धरणाचे महत्व मा. मंत्री महोदयांना पटवून दिले. या शेतकरी कन्येच्या निवेदनाची मा. मंत्री महोदयांनी तात्काळ दखल घेत, धरणाचे काम सुरू करण्याचे आदेश दिल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.