<
जळगांव (धर्मेश पालवे)- या वर्षीच्या रणरणत्या उन्हात होणाऱ्या तहानेला आणि थकव्याला भागवण्यासाठी जळगाव म न पा ने “ना नफा ना तोटा” या तत्वावर किरकोड वसुली विभाग अधीक्षकांच्या देखरेखीखाली म न पा अंतर्गत जिल्ह्यातील काही सेवाभावी संस्था आणि बचत गटांना आर ओ वाटर ATM शहरातील विविध ठिकाणी सुरू केले होते.
या मध्ये रहदारी आणि लोकसहभाग व वर्दळीचे ठिकाण असलेले महात्मा फुले मार्केट,गोलानी मार्केट,नेहरू चौक, जुने बस स्टॅन्ड, नवीन बस स्टॅन्ड, आणि पोलीस मुख्यालय च्या आवारात वाटर ATM बसवण्यात आले आहेत.
या वाटर ATM स्टोल ची साईज 4×6 असून त्यांची परवानगी कालावधी हा 1मार्च19ते 30जून19 असा होता, जो पोलीस परवाणगीच्या अधीन आहे,मात्र कालावधी उलटूनही हे स्टोल अजूनही उभे आहेत, ज्यात पाणी तर नाहीच मात्र भर पावसात कुत्री आसरा शोधत दबा धरून बसताना दिसून येत आहेत।पावसाचं पाणी srvtr साचून घाणीचे चित्र ही काही ठिकाणी दिसून आलं आहे।
त्याच बरोबर रहदारीसही अडथळा होत आसल्याचं मार्केट मधील नागरिक कडून बोललं जातं आहे. परिणामी दुर्लक्षिल्या गेल्याने तुटक्या अवस्थेतील हे वाटर ATM किरकोड वसुली विभाग जळगांव मनपा च्या निदर्शनास येत नसून चक्क हातावर घडी तोंडावर बोटअशी भूमिका घेत आहे असें दिसून येत आहे .म्हणून या विभागाला याचा विसर पडला आहे असेम्हणणे वावगे ठरू नये.