<
प्रशासनाशी आर्थिक हातमिळवणी करून वाळूवाले बनताय मालामाल
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव तालुका हद्दीतील गिरणा नदीपात्रात अवैध वाळू उचल करून घेण्यासाठी शेकडो ट्रॅक्टर व शेकडो मजूर राबत असल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळत असल्याने यात वाळू माफियांनी महसूल व इतर विभागाशी आर्थिक हात मिळवनी करून गिरणा नदीचे लचके तोडण्याचा विडा उचलला आहे.
महसूल प्रशासनाने अद्याप एकही वाळू ठेका दिलेला नसतांना नदी पात्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात बेसुमार वाळू उपसा करून नेण्यासाठी वाहने कशी उतरलेली आहेत. त्याच बरोबर हे वाळू माफिया दिवसा ढवळ्या शहरात व शहराच्या बाहेर वाळू वाहतूक करत आहे तरी देखील प्रशासन झोपेचे सोंग घेतांना दिसत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये महसूल प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होतांना दिसते.