<
जळगाव – (प्रतिनिधी) – समता सैनिक दलाच्या वतीने जिल्हा प्रबोधन मेळावा दिनांक 28 मार्च 2020 रोजी जळगांव शहरात आयोजित करण्यात आला होता. परंतु सद्या जगात व देशात कोरोनो व्हायरस मुळे राष्ट्रीय आपत्ती निर्माण झाली आहे. संपूर्ण जग व भारत या मुळे हादरले आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकार यांनी सार्वजनिक कार्यक्रम व गर्दी जमा करण्यावर वर बंदी घातली आहे. हा जनहित चा निर्णय आहे. या निर्णय चे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे, हे आपल्या हितासाठी त्यामुळे समता सैनिक दलाचा नियोजित जिल्हा प्रबोधन मेळावा रद्द करण्यात येत आहे. तरी समता सैनिक दलाच्या कार्यकर्ते यांनी शक्य होईल तेवढे कोरोनो व्हायरस पासून बचाव साठी जनजागृती करावी आणि गर्दी चे कार्यक्रम टाळावे ,कोरोनो व्हायरस आटोक्यात आल्यानंतर पुढील तारीख व ठिकाण कळविण्यात येईल तरी सर्व जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी – बुद्धीजीवी अधिकारी – कर्मचारी – हितचिंतक – कामगार – विद्यार्थी – पत्रकार यांनी नोंद घ्यावी. असे आवाहन विजय निकम जिल्हाध्यक्ष स.सै. द जळगांव यांनी केले आहे.