<
कासोदा ता. एरंडोल ( सागर शेलार ) :- संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी कायदा कलम १४४ नियम लागू करण्यात आला आहे . त्याअनुषंगाने आज दि.२४ रोजी प्रांताधिकारी एरंडोल यांच्या आदेशांवे कासोदा पोलिस स्टेशनचे स.पो.नि.रविंद्र जाधव यांनी ग्रामस्थांना , तसेच किराणा दुकानदार अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांना आदेशपत्रका प्रमाणे वेळापत्रक काढून नोटीस दिल्याचे सांगितले.त्यात वेळ निच्चीती खालील प्रमाणे केली आहे.
१) किराणा दुकान वेळ सकाळी ९ ते १ वा. पावेतो ..
२) दूध केंद्र सकाळी ८ ते १० ; व संध्याकाळी ५ ते ७ वाजे पावेतो..
३) मेडिकल वेळ सकाळी ९ ते १ व संध्याकाळी ५ ते ८ वाजे पावेतो …
४ ) भाजीपाला दुकाने सकाळी ८ ते १२ वाजे पावेतो….
वरील विषया खेरीज बाहेर पडू नका आम्हाला सहकार्य करा संचारबंदीतील नियम काटेकोर पणाने पालन करावे , ५ पेक्षा जास्त नागरिकांनी एकत्र येऊ नये , अन्यथा साथीचा रोग प्रतिबंधक अधिनियम १८९७ व इतर तत्सम प्रचलित कायद्यांवे कायदेशीर फौजदारी कार्यवाही करण्यात येणार असल्याचे स.पो.नि.रवींद्र जाधव यांनी सांगितले.
तसेच सत्यमेव जयते न्यूज़ यांनी देखील ग्रामस्थांना आव्हान केले आहे , की विनाकारण बाहेर पडू नका आपली व आपल्या मुला बाळांची काळजी घ्या व डॉक्टर्स , पोलीस यांना व प्रशासन आणि शासन यांना सहकार्य करा .