<
नांद्रा/पाचोरा(प्रमोद सोनवणे )- येथे सकाळी संपूर्ण गावात ग्रामआरोग्य पाणीपुरवठा समितीच्या निधीतुन (आरोग्य विभाग ) व ग्रामपंचायत नांद्रा यांच्या संयुक्त विद्यमाने संपुर्ण गावात सँनेटाईजर व फिनाईलची फवारणी करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष सरपंच शिवाजी तावडे, सचिव आशा सेविका सुनिता पाटील, ग्रामविकास अधिकारी एस.एस.सत्रे, तलाठी किर्ती चौधरी, पोलिस पाटील किरण तावडे, ग्रा.प.सदस्य बापु सुर्यवंशी, पंकज बाविस्कर, योगेश सुर्यवंशी, प्रा.यशवंत पवार, साहेबराव साळवे, नांद्रा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डाँ ज्ञानेश्वर सय्यांसे, आरोग्य सहाय्यक राजेंद्र महाजन, आरोग्य सेविका माया सोनवणे, आरोग्य सेवक श्री.वानखेडे, सह आशा सेविका प्रतिभा सोनवणे, दिपाली पाटील यांच्या सह ग्रामपंचायत कमेटीच्या पुढाकाराने कोरोणा व्हायरस ह्या जिवघेण्या विषाणूचा सामना करण्यासाठी गावात फवारणी करण्यात आली फवारणी कामी नांद्रा येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर प्रकाश पाटील हे आपल्या टँकरने मोफत पाणीपुरवठा केला. दुसखेडा ग्रा.प.चे.कार्मचारी गणेश पाटील यांचे या कामी मार्गदर्शन व सहकार्य लाभले.