<
जळगाव, दि. 28 – राज्यातील कोरोना विषाणूंच्या संक्रमणामुळे उद्भभवलेल्या अभूतपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर कोषागार कामकाजाचे नियमन करण्याच्यादृष्टीने आर्थिक वर्ष 2019-2020 च्या अनुदानाशी निगडीत बीम्स/बील पोर्टल प्रणालीवरून 27 मार्च, 2020 पर्यंत निर्गमित झालेल्या प्राधिकारपत्रांसह सादर करण्यात आलेली देयके सोमवार 30 मार्च, 2020 रोजी दुपारी 1.00 वाजेपर्यंतच स्वीकारण्यात येतील, असे निर्देश शासनाच्या वित्त विभागाने दिले आहेत.
वित्त विभागाच्या निर्देशानुसार कोरोना आजाराशी निगडीत सर्व देयकांसोबतच सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांची आरोग्य सेवेशी निगडीत देयके मात्र 30 मार्च, 2020 रोजी दुपारनंतरसुद्धा स्वीकारण्यात येतील. याची सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी. असे संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई ज. र. मेनन यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.