<
पाचोरा(प्रमोद सोनवणे)- येथील तालुका कृषी अधिकारी व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा योजनेअंतर्गत कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बाजारात होणारी गर्दी टाळण्या करीता तालुका कृषी अधिकारी पाचोरा व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा योजनेअंतर्गत शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेनुसार शेतकऱ्यांकरीता थेट भाजीपाला विक्री व्यवस्था कोरोना विषाणूच्या मार्गदर्शक सुचनेनुसार व घेण्यात येणारी काळजीची संपूर्ण माहिती देऊन व त्यांचे हमीपत्र भरून त्यांना परवाने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सदरील योजनेतून बांबरूड(राणीचे) येथील युवा प्रयोगशील आदर्श शेतकरी मयुर वाघ, सुधाकर वाघ, किरण वाघ यांनी पाचोरा शहरात भाजीपाला विक्री केली. त्याकरिता त्यांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, तालुका कृषी अधिकारी ए.व्ही.जाधव व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सचिन भैरव यांचे सहकार्य लाभले. कृषी विभागामार्फत सदरील योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.