<
विरोदा(किरण पाटिल)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावा बाहेरून हंबर्डी गावात आलेल्या जवळपास ३५ नागरिकांना होम कॉरंटाइनसाठी आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन शिक्के मारण्याचे काम देखील पूर्ण करण्यात आले असून आरोग्य विभागाकडून १४ एप्रिलपर्यंत घरीच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या.असल्याची माहिती हंबर्डी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सेविका श्रीमती के.एस.किनगे यांनी सांगितले. तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत बऱ्हाटे हिंगोणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी फिरोज तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना व्हायरस या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी गावात घरोघरी जाऊन आरोग्य तपासणीही करण्यात आली. करोना या विषाणू व्हायरस विषयी गावातील नागरिकांना जनजागृती करून व यापासून कशा प्रकारची काळजी घ्यावी कोणीही घराबाहेर पडू नये,घरातच थांबावे गावातील नागरिकांनी तोंडाला मास्क किंवा रुमाल लावून घराबाहेर पडावे. महिला पुरुषांनी ही काळजी घेणे महत्त्वाचे आहे.असेही आरोग्यसेविका श्रीमती के.एस.किनगे यांनी सांगितले. यावेळी सरपंच महेंद्र पाटील, माजी सरपंच विद्यमान सदस्य किशोर पाटील, पोलिस पाटील प्रसन्न कुमार पाटील, ग्रामसेवक बी.व्ही.वायकोळे,आशासेवीका हजरा तडवी, मदतनीस शोभा नेहते, शिपाई राजू तडवी, अंगणवाडी सेविका शालिनी बेंडाळे यांनी ही जनजागृती करुन आवाहन केले.