भडगांव – (प्रमोद सोनवणे )- येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात रक्तदानाची कमतरता भासु नये या उद्देशाने मा. मुख्यमंत्री श्री. उद्धवजी साहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये तसेच पाचोरा-भड़गाव मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भड़गाव येथील शिवसेना – युवसेनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की,सध्या देशासह जगामध्ये कोरोना वायरसने धुमाकुळ घातला असल्या कारणाने जगाची परिस्थिति गंभीर झाली आहे. सध्याची कोरोनाग्रस्तांची परिस्थिति पाहता भारतातही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहेत.पुढे अशीच परिस्थिति असली तर ही परिस्थिति आटोक्यात आणने कठिन होणार आहे.म्हणून परिस्थितिवर मात करण्याकरिता रक्ताची ही गरज भासनार आहे.या उद्देशाने पाचोरा-भड़गाव चे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या संकल्पनेतून व भड़गाव तालुका तसेच शहर शिवसेना- युवसेना तसेच महिला आघाडी यांच्या वतीने आज दि. ०१/०४/२०२० रोजी येथील शिवतीर्थ शिवसेना कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदर शिबिरात ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गणेशअाण्णा परदेशी माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील तालुकाप्रमुख डॉ. विलास पाटील शहरप्रमुख योगेश गंजे विधानसभा क्षेत्र प्रमुख जे के पाटील नगराध्यक्ष अतुल पाटील माजी सभापती पप्पू दादा, माजी नगराध्यक्ष सुनील देशमुख नगरसेवक जग्गू दादा संतोष महाजन माजी नगराध्यक्ष डॉ. वसीम मिर्झा माजी शहरप्रमुख मनोहर चौधरी सोनू खाटीक मोसिम खान जाकीर मन्यार खलील मिस्तरी उपतालुकाप्रमुख सतीश पाटील राहुल पाटील युवा सेनेचे शहर प्रमुख निलेश पाटील जिल्हा सरचिटणीस लखीचंद पाटील रवींद्र (पप्पू) पाटील वडजी ज्ञानेश्वर पाटील रवींद्र पाटील बोदर्डे आदी शिवसैनिक उपस्थित होते. तसेच सदर शिबिर शिवसेनेचे नगरसेवक डॉ. प्रमोद पाटिल व रेड प्लस ब्लड बँकेच्या डॉक्टरांची टीम यांच्या परिश्रमाने पार पडले.