<
भुसावळ तालुका वैद्यकीय कार्यालय तात्काळ स्थलांतरित करण्याची गरज
भुसावळ-(दिपक सपकाळे) येथील तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयात पावसामुळे गळती लागली असून, टेबल, खुर्च्या, संगणक ओलेचिंब झाले आहे. इमारतही जीर्ण झाली असून छतातून पावसाचे पाणी गळत आहे. आणि छताच्या स्लँब चे प्लाँस्टरचे तुकडे वारंवार पडत आहेत. कर्मचाऱ्यांना कामे करतांना भिती वाटते. कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. छताचा स्लँब कोणत्याही वेळी पडण्याची शक्यता आहे. सदर इमारतीचे स्ट्रक्चरल आँडीट करणे अत्यावश्यक आहे. सदर कार्यालय तात्काळ स्थलांतरित करावे असे काही कर्मचारी यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली. कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी जागा नाही,भेटायला येणाऱ्या, कर्मचारी व नागरिकांना पिण्याचे पाणी, संडास मुतारीची व्यवस्था अपूर्ण आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय प्रशस्त वा कार्पोरेट असणे गरजेचे आहे. तालुका वैद्यकीय कार्यालयांनाच आरोग्य सुविधेची गरज निर्माण झाली असल्याचे चित्र सध्या तरी निर्माण झाले आहे.