Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/07/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

फैजपुर(प्रतिनिधी) – दि.२७ रोजी तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न झाला. कै. लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष मा.शिरीषदादा मधुकरराव चौधरी, प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, मा.मिलिंद वाघुळदे- तापी परिसर विद्या मंडळ व्यवस्थापन परिषद सदस्य,प्राचार्य तुकाराम बोरोले -अध्यक्ष माजी विद्यार्थी संघटना, मा.गणेश गुरव मुख्याध्यापक , प्रा.डाॅ .जतीन मेढे , प्राचार्य नि रा फेगडे, मा. चंद्रशेखर चौधरी, चंद्रकांतदादा, भाऊराव दादा, माजी विद्यार्थी मंडळाचे समन्वयक उपप्राचार्य प्रा. डी. बी. तायडे, उपप्राचार्य डॉ. उदय जगताप व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. डी. बी. तायडे यांनी केले. त्यात त्यांनी सांगितले की, लोकशाही मूल्यांवर आधारीत निर्मिती व्हावी म्हणून या तापी परिसर विद्या मंडळ या संस्थेची व धनाजी नाना महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली.माजी विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणीनां उजाळा देण्यासाठी माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला असे मत व्यक्त केले. प्राचार्य श्री तुकाराम बोरोले यांनी शिक्षणाशिवाय उत्कर्ष होणार नाही याची जाणीव ठेवून या महाविद्यालयाची निर्मिती झाली आहे. श्रम संस्कार या महाविद्यालयाने जपले आहे. या महाविद्यालयातून ज्यांनी शिक्षण घेतले त्यांनी स्वतःच्या विकासासोबत समाजाचाही विकास केला आहे या संस्थेने अनेक पिढ्या घडविल्या आहेत.म्हणून या संस्थेचा इतिहास जपून ठेवण्याची गरज आहे.असे प्रतिपादन केले. उपप्राचार्य डॉ उदय जगताप यांनी NAAC संदर्भातील आवश्यक माहिती दिली.श्री गणेश गुरव यांनी या महाविद्यालयाने उच्च शिक्षणासोबत लोकशाही मूल्ये दिली. राष्ट्र निर्मिती मध्ये या महाविद्यालयाचे मोठे योगदान आहे. डॉ कल्पना पाटील व मोजेस जाधव सर यांनी मनोगत व्यक्त केले.प्राचार्य डॉ.पी. आर.चौधरी यांनी यावल व रावेर तालुक्यातील आर्थिक, शैक्षणिक विकास या महाविद्यालयाने कसा केला कै. लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या दूरदृष्टीने या परिसरात शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. या महाविद्यालयाने सामाजिक बांधूलकीचे मूल्य या परिसरातील लोकांना दिले माजी विद्यार्थी संघटनेचे महाविद्यालयावर निष्ठा आणि प्रेम असल्याने या माध्यमातून नव्या पिढीसाठी काही करता येईल असे प्रतिपादन केले.संस्थेचे अध्यक्ष मा. शिरीषदादा मधुकरराव चौधरी यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी लोकसहभागातून धनाजी नाना महाविद्यालायची निर्मिती झाली आहे.या महाविद्यालयाचे असंख्य माजी विद्यार्थांनी शिक्षण,समाज, अर्थ, विज्ञान, राजकारण कृषी क्षेत्रात आपलं नाव मोठं केलं आहे. महाविद्यालयात शेतकरी ,शेतमजूर, ग्रामीण दलित आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत याचा मनस्वी आनंद होत आहे बदलत्या काळानुसार नवीन अभ्यासक्रम सुरू केले जात आहेत.पुढील काळात Placement सेल निर्माण करून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील असे प्रतिपादन या प्रसंगी केले. यावेळी बहुसंख्येने माजी विद्यार्थी,विद्यार्थिनी उपस्थित होते सूत्रसंचालन प्रा.कुमुदिनी धांडे,प्रा. राजेंद्र राजपुत यांनी केले तर आभार प्रा.डॉ कल्पना पाटील यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भडगांव येथे संत शिरोमणी सावता माळी पुण्यतिथी व गुणगौरव सोहळा साजरा

Next Post

तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय सलाईनवर

Next Post
तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय सलाईनवर

तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय सलाईनवर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo