जळगाव, दि. 3 (जिमाका वृत्तसेवा) : फेसबुक या सोशल माध्यमाद्वारे पवन रायगडे व गोपाळ पाटील या दोन्ही फेसबुक अकाऊंटवरून समाजाच्या धार्मिक भावनांचा अपमान करणारी पोस्ट प्रसिध्द करण्यात आली होती. या दोन्ही व्यक्तींचा शोध घेतला असता पवन रायगडे हा वेरुळी ता. पाचोरा जि. जळगाव येथील तर गोपाळ पाटील हा गिरड, ता. भडगाव, जि. जळगाव येथील राहणार असल्याचे निष्पन्न झाले आहे. या दोन्ही व्यक्तींविरुध्द पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणीही फेसबुक, व्हाट्सअप किंवा इतर सामाजिक माध्यमांद्वारे वरील दोन्ही व्यक्तींच्या पोस्टला किंवा त्यांचे स्क्रिन शॉटला शेअर करु नयेत. तसेच कोणीही अशाप्रकारे आक्षेपार्ह पोस्ट सोशल माध्यमांद्वारे टाकू नये अन्यथा त्यांचेवरही गुन्हा दाखल करण्यात येईल. असा इशारा पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक अनिल शिंदे यांनी दिला आहे.