कासोदा ता.एरंडोल ( सागर शेलार )- येथील कोरोना दक्षता समितीने गरिबांना एकदिवसीय पालकत्व स्वीकारून भाजी पोळी सह टरबूज चे केले अन्नदान. सध्या देशभरात कोरोना संसर्गजन्य साथरोग विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनानाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात लॉकडाऊन सुरू आहे . शासना सह पोलीस प्रशासनाची दमछाक होत आहे. हे लक्षात घेऊन पोलीस प्रशासनास मदत व्हावी . म्हणून कासोद्यातील तरुणांनी पुढाकार घेतला . व तहसीलदार सौ .अर्चना खेतमाळीस यांनी आपल्या सही व शिक्यासह आयडिकार्ड बनवून दिले. यामुळे पोलीस प्रशासनास मदत होत आहे. दि . २ एप्रिल रोजी असलेल्या श्रीराम नवमी साजरी करावी म्हणून कोरोनामुळे हातावर पोट असलेल्या कासोदा येथील फासेपारधी नगर व भिल्लवस्ती येथील नागरिकांना एक दिवसीय जेवन म्हणून शेव भाजी पोळी , टरभुज व फरसाण चे पॉकेट दिले.
त्याप्रसंगी कोरोना दक्षता समितीचे सदस्य , गोविंद बागुल , शैलेश पांडे , पत्रकार राहुल मराठे , शैलेश मंत्री , हरीश पटेल , संजय जमादार , गोविंद शेलार , दिपक शिंपी , शाम पाटील , स्वप्निल बियाणी , पत्रकार सागर शेलार , नाना शिंदे , उमेश नवाल बंटी ठाकरे , वासुदेव वारे , गोविंद चौधरी , गोविंद अग्रवाल , मनोज पिंगळे , पवन राजपूत , उपस्थित होते.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.