<
जळगांव-(प्रतिनिधी) – सध्या आपल्या देशासह जगामध्ये कोरोना या विषाणूच्या फैलवामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर उपाययोजना करणेसाठी केंद्र व राज्य शासन अहोरात्र काम करीत आहे. म. धर्मादाय आयुक्त, म.रा., मुंबई तसेच नीती आयोग नवी दिल्ली यांचे कडून स्वयंसेवी संस्थांनी सामाजिक उत्तरदायित्व व बांधिलकी म्हणून या निर्माण झालेल्या बिकट परिस्थिती मध्ये मदत करून राष्ट्रीय आपत्ती निवारण करणेस मदत करावी असे आवाहन केलेले आहे.
मा. पंतप्रधान यांनी देशात लॉकडाऊन घोषित केल्यानंतर परराज्यातून बांधकाम सह इतर क्षेत्रात दैनंदिन मजुरीवर काम करणारे गरीब कष्टकरी मजुरांच्या हाताला काम नाही. काम नसल्यामुळे मजुरीचे पैसे मिळणे बंद झाले व उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मातृभूमी सर्वांगीण विकास संस्था, जळगाव या संस्थेचे अध्यक्ष संजय जगन्नाथ बडगुजर यांनी सामाजिक उत्तरदायित्व व बांधिलकी जोपासण्याच्या दृष्टीने करोना युद्धात स्थलांतरित गरीब मजुरांना अन्न धान्य पुरविणेसाठी म. जिल्हाधिकारी, जळगाव यांचेकडे परवानगीसाठी पत्र दिले. व फक्त १ दिवसात त्यांनी खेडी ता. जि. जळगाव येथील खांडवा (म.प्र.) येथील स्थलांतरित बांधकाम मजुरांना अन्नधान्य वाटप करणेसाठी परवानगी दिली.
संस्थेने खेडी येथील महसूल विभागाचे तलाठी श्री. प्रवीण बेंडाळे व पोलीसपाटील यांचेशी संपर्क साधून गरजू बांधकाम मजुर कुटुंबासह लाभार्थी ची यादी तयार करून त्यांना जेवनासाठी आवश्यक कोणत्या प्रकाराचे किती अन्नधान्य पाहिजे याची माहिती घेतली.
संस्थेने मागणी आधारित नियोजन केलेनंतर दि. 4 एप्रिल २०२० रोजी सकाळी १०.३० वा. खेडी ता. जि. जळगाव येथे १८ मजुर कुटुबाना घरपोच १० कि गहू, ३ कि तांदूळ, १ कि तुरडाळ, १ कि गोडेतेल, १ Dettol साबण असे अन्नधान्य व वस्तू पुरविल्या सदर अन्नधान्य व वस्तू वाटप मा. शेख साहेब (IFS) विभागीय वनधिकारी, सा.व.विभाग, जळगाव, श्री. संजय जगन्नाथ बडगुजर ,अध्यक्ष- मातृभूमी सर्वांगीण विकास संस्था, जळगाव, श्री. भूषण लाडवंजारी, अध्यक्ष- तुळजाई बहुउद्देशीय संस्था, मेहरूण, श्री. सुनील वाणी, अध्यक्ष- अष्टविनायक संस्था,जळगाव, श्री. भास्कर शंकर बडगुजर, अध्यक्ष -निर्मल सेवाभावी संस्था, कढोली अर्थ फाउंडेशन चे अध्यक्ष प्रा विक्रांत जाधव,लोकसंवाद संस्थचे अध्यक्ष शिरीषकुमार तायडे, श्री. मुकेश वना बडगुजर श्री आशीष वाघ, मंडल अधिकारी, श्री प्रवीण बेंडाले यांचे हस्ते करण्यात आले.
देशावर ओढावलेल्या या आपत्ती मध्ये माणुसकी जपून बऱ्याचशा सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक संस्था पुढाकार घेत आहेत. आपल्याला ही शक्य असेल तर गरजूंना मदत करा. माणूसकी जपा. घरी रहा सुरक्षित यहा. कोरोना विरुद्ध च्या लढ्यात योध्दा बनून आपल्याला कोरोना वर मात करायची आहे.