<
जामनेर-(अभिमान झाल्टे) – शहरातील भागामध्ये एकाच समाजातील दोन गटात चाकू, कुऱ्हाड, लाठ्या व इतर धारदार वस्तूंचा वापर करून रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास अराफत चौकाजवळ तुफान हाणामारीत ७ गंभीर अवस्थेत जखमी झाले होते. त्यांच्यावर जामनेर उपजिल्हा रुग्णालयात प्रथोपचार करून पुढील उपचारार्थ त्यांची रवानगी जळगाव जिल्हा रुग्णालयात करण्यात आले.
उपस्थितांच्या माहीतीवरून शनिवारी रात्री पोलीस गाडी आल्याने रस्त्यावरील नागरिकांनी पळ काढला.
त्यावेळेस एका गटातील महिलेला धक्का लागल्याच्या कारणावरून रात्रीच शाब्दिक वाद झाला.
तसेच हा वाद रात्रीच मिटवण्यात आला होता. परंतु ज्या महिलेला धक्का लागला त्या गटाकडून पुन्हा सकाळी वाद होऊन दोन्ही गटात धारदार शस्र व काठ्या वापरून एकमेकांवर हल्ला चढवला.
यात शेख जमील शेख रसूल वय (३८) ,अबीद शेख खालिद (३०) ,अजीम शेख जालीम (२२), मोह साबीर शेख युनूस (२५), शेख जलील शेक सईद, शेख अल्ताफ शेख सईद हे जखमी झाले आहे. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या नेतृत्वाखाली जामनेर पोलिसांनी आराफत चौकात धाव घेऊन जखमींना दवाखान्यात पाठवून दोन्ही गटाला शांत करून परिसरात शांतता निर्माण केली. जामनेर पोलिसात अजून कोणत्याही गुन्ह्याची नोंद केली नसून उपचारानंतर पोलीस कार्यवाही होणार असल्याची माहीती पोलिसांकडून होत आहे.