<
मुंबई-(प्रतिनीधी) – भारतात Coronavirus ची साथ अद्याप दुसऱ्या टप्प्यात आहे. याचा अर्थ ही साथ कम्युनिटी स्प्रेडच्या स्वरूपात पसरलेली नाही. पण AIIMS च्या संचालकांनी मुंबईसाठी धोक्याचा इशारा दिला आहे. आता ज्या भागात हा टप्पा गाठला आहे, तिथेच ती आटोक्यात ठेवली नाही, तर संपूर्ण शहरभर हा व्हायरस झपाट्याने पसरेल आणि मग आता न्यूयॉर्क किंवा सुरुवातीला वुहानची झाली, तशी अवस्था येईल. धक्कादायक म्हणजे गुलेरिया यांनी या थोडक्या भागांमध्ये मुंबईचं नाव घेतलं.
अजूनही मुंबई-पुण्यातले नागरिक लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोटरणे पाळत नाहीत
आता त्यांनी या साथीचं गांभीर्य ओळखलं नाही, तर नंतर उशीर झालेला असेल, असाच याचा अर्थ आहे. अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये सध्या ही स्थिती आली आहे. कालच्या एका दिवसात अमेरिकेत 1500 जणांचा बळी गेला. कोरोनाग्रस्तांची संख्या अमेरिकेत लाखावर पोहोचली आहे. ती स्थिती टाळायची असेल तर आत्ताच सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून घरात राहायला हवं. अनावश्यक कारणासाठी बाहेर जाणं टाळायला हवं.
आठवड्यातून एकदाच बाहेर पडण्याचं पुणेकरांना आवाहन
पुण्यात एका दिवसात 41 कोरोनारुग्णांची भर पडली. मुंबईत दिवसभरात 68 रुग्ण वाढले. मुंबईत 24 तासांत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. याचा अर्थ कोरोनाग्रस्तांचं प्रमाण गुणाकार पद्धतीने वाढायला सुरुवात झाली आहे. पुण्याचा काही भाग आणि मुंबईचा ठराविक भाग इथे ही वाढ मोठ्या प्रमाणावर दिसते आहे. त्यामुळे हे भाग पूर्ण सील करण्यात आले आहेत. या भागातला फैलाव शहरभर पसरू नये म्हणून लॉकडाउनचे नियम काटेकोरपणे पाळणं गरजेचं आहे.
पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणेकरांनाही आठवड्यातून एकदाच आवश्य गोष्टींच्या खरेदीसाठी घराबाहेर पडा, असं आवाहन केलं आहे. कारण कोरोनाव्हायरसने आता लोकलाइज्ड कम्युनिटी स्प्रेडच स्वरून दाखवायला सुरुवात केली आहे. घरातल्या एकाच व्यक्तीने आठवड्यातू एकदा किंवा फारतर दोनदा बाहेर जावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
देशाच्या काही भागात Coronavirus तिसऱ्या टप्प्यात पोहोचला असल्याची चिंताजनक माहिती, AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली. ‘जगाच्या तुलनेत आपल्या देशातली परिस्थिती बरी असली, तरी काही भागात वाढलेली कोरोनाग्रस्तांची संख्या ही चिंता वाढवणारी आहे, असं गुलेरिया म्हणाले.