<
जळगांव(प्रतिनिधी)- सध्या संपूर्ण देशासह राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून राज्य सरकार सर्वोतपरी प्रयत्न करताना दिसत आहे. या कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी 21 दिवसाचा लॉकडाउन ठेवण्यात आला आहे. यामध्ये हातावर पोट भरणाऱ्यांचे हाल होत आहे. अशातच एक सामाजिक बांधिलकी जपत स्वप्न साकार व मौलाना आझाद फाऊंडेशन च्या वतीने शहरातील शिरसोली रोड वरील व मोहाडी परिसरातील झोपडपट्टी भागात स्वप्नसाकार फौंडेशन व मौलाना आझाद फौंडेशनच्या वतीने गरजू कुटूंबाना जेवण व मास्क वाटप करण्यात आहे. प्रसंगी भारती काळे यांनी कोरोना व्हायरस बाबत महिलांना मार्गदर्शन करून अश्या परिस्थितीत सर्वांनी काळजी घ्यावी व मास्कचा वापर करावा, वारंवार हात स्वच्छ साबणाने धुवावे, घरच्या बाहेर जाऊ नये या बाबत महिलांना मार्गदर्शन केले. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने १०० मास्क देखील वाटप करण्यात आले. या वेळी स्वप्नसाकार फाऊंडेशनचे अध्यक्षा भारती काळे, मौलाना आझाद फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख, राकेश कंडारे, प्रा. नारायण पवार, चेतन निंबोळकर, सुनील गजभिये, जुबेर शेख आदीं उपस्थित होते.