<
विरोदा(किरण पाटील)- दृष्ट प्रवृत्तीच्या अज्ञात भामट्याने शेतकऱ्यांच्या गव्हाच्या गंज्जीला आग लावून पेटवून दिल्याचा प्रकार विरोदे येथे तिसऱ्या दिवशीही घडल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शेतकरी अर्धा पोटी उपाशी राहून रात्रंदिवस शेतात काबाडकष्ट करीत असतो.रात्रीही शेतात जाऊन पिकांना पाणी देत असतो.ऐन तोंडाची घास आल्यावर मजुरांकडून गव्हाची कापणी करून घेतात. एकत्रित जमा करून दुसऱ्या दिवशी मळणी करून या उद्देशाने गव्हाची गंजी मारून घेत असतो. शेतकरी घरी आल्यावर कोणीतरी अज्ञात दोष प्रकृती असलेला इसम गव्हाच्या गंज्या पेटवून देत असतो. त्यामुळे शेतकरी हा भयभीत झाला आहे. नुकताच दिनांक ४ एप्रिल रोजी रात्री नऊ ते साडे नऊच्या दरम्यान शेतकरी भास्कर कौतिक चौधरी यांचे शेत खेडने गहू पेरण्यासाठी शेतकरी प्रमोद दपाळू चौधरी यांनी अडीच बिघ्यांमध्ये गहू पेरला होता. अज्ञात कोणीतरी भामट्याने आग लावून ३८ ते ४० हजारांचे नुकसान केले होते.चार दिवस होत नाही तोवर दिनांक ७ एप्रिल रोजी शेतकरी ओंकार गणू तायडे यांचे शेत खेडने करणारा प्रकाश भिका बऱ्हाटे यांचे अडीच बिघ्यातील शेतात गव्हाची गंजी लावलेली होती. विकृत प्रवृत्तीच्या इसमाने पेटवून दिली. त्यामुळे ५५ ते ६० हजारांचे नुकसान झाले आहे. सदरची आग ही पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास लावण्यात आली. आग विझवण्यासाठी अमोल वारके या ग्रामस्थाने लागलीच सावदा,फैजपूर नगरपालिकेचा अग्निशामन दलाला काळळवले होते. लागलीच अग्निशामन दल दाखल झाल्याने आग विझवण्यात आली. या शेतकऱ्यांच्या गव्हाच्या गंज्जीला अज्ञात समाजकंटकांनी आग लावून नुकसान केल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.आता न्याय कोणाकडे मागावा असा प्रश्न चिन्ह कायम राहिला आहे. विरोदे ग्रामस्थ शेतकऱ्यांनी शोध घेणे जरुरीचे आहे.अन्यथा ही प्रवृत्ती भामट्याची अशीच वाढत जाऊन अनेक गोरगरीब शेतकऱ्यांच्या गहु व इतर पिकांचे नुकसान होत राहील.म्हणून याकडे पोलीस खात्याने लक्ष देऊन या प्रवृत्तीला आळा घालणे गरजेचे आहे.