<
जळगाव-(प्रतिनिधी) – येथील रनर्स ग्रुप व रोटरी क्लब जळगाव वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ना नफा ना तोटा फळे व भाजीपाला अशा सुरक्षित बाजारला ऊस्फुर्त प्रतिसादयावर्षी कोरोणा आजारामुळे शेतकऱ्यांवर जे संकट कोसळले आहे त्यावर मात म्हणून जळगाव जिल्ह्यातील जे शेतकरी भाजीपाला व फळे अशी पीके साधारण आठ दिवसात काढून बाजारात नेण्यायोग्य असतात अशा पिकांचा शेतकऱ्यांना मोबदला मिळावा व त्यांचेआर्थिक नुकसान भरून निघावे यासाठी बांदा पासून ते थेट ग्राहकापर्यंत ना नफा ना तोटा या तत्त्वावर फळे व भाजीपाला सुरक्षित बाजार म्हणुन आम्ही नूतन मराठा महाविद्यालयाचे प्रांगण जळगाव येथे दिनांक ८ एप्रिल ते १४ एप्रिल पर्यंत भरविला आहे या बाजाराला आज पहिल्याच दिवशी मोठ्या संखेने नागरीकांनी लाभ घेतला.सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ६ अशी आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातून भाजीपाला थेट आपल्या पर्यंत पोहोचवा ,भाजीपाला घ्यायला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे सॅनिटांयझीग करणे, सोशल डिस्टन्सचे तंतोतंत पालन करणे, भाजीपाला व फळे नागरिकांना रास्त दरात मिळणे ,कोरोणा आजाराची काळजीच्या अनुषंगाने स्वस्त दरात मास्क सुद्धा येथे उपलब्ध करण्यात आले आहेत.यासाठी जळगाव रनर्स ग्रुप व रोटरी क्लब आॅफ जळगाव वेस्ट या दोन्ही संस्था संयुक्त विद्यमाने हा जळगाव रनर्स ग्रुप व रोटरी सुरक्षित बाजार असा ना नफा ना तोटा तत्त्वावर उपक्रम राबवित आहेत.