<
जळगांव(प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या आदेशावरून कोरोना आजाराचा प्रसार रोकण्यासाठी सर्व ग्रामीण शाळांना दि. १८ मार्च ते ३१ मार्च पर्यंत सुट्टी घोषित करण्यात आली, त्यानंतर या शाळेने दिनांक २० मार्च पासून शाळेच्या व्हाट्सअप ग्रुप वर विद्यार्थ्यांना रोज गृहपाठ देणे सुरू केले वर्चुअल क्लासेस द्वारे त्यांना प्रश्नपत्रिका सोडवणे सराव करून घेतले महिना अखेरपर्यंत चाललेल्या या ऑनलाईन वर्च्युअल क्लासमध्ये पालकांनीसुद्धा तेवढाच सहभाग नोंदवला व त्यांची प्रतिक्रिया दिल्या.आता त्यांना (दि.१ ते १५ एप्रिल) पर्यत व्हाट्सअप वर रोज नियमित व्यायाम करणे व्यायामाचे फायदे हे शिकवले जात असून रोज विविध प्रकारचे गोष्टी, कागदा पासून विविध गोष्टी तयार करणे अशा नवीन वस्तू शिकवण्यात येत आहेत. शिक्षक, विद्यार्थी व पालक संवाद साधत आहेत. पालकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांना सुट्टीच्या मानसिकतेतून बाहेर काढून त्यांच्यासोबत आपण आहोत आणी वेळेचा उपयोग कसा करायचा विद्यार्थ्यांना वेळापत्रक देणे हे सर्व करून घेतले, या सर्व कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक संस्थाध्यक्ष मनोज कुमार पाटील, मुख्याध्यापिका तनुजा मोती व संचालिका कु. प्रतीक्षा पाटील यांचे मार्गदर्शन तसेच शिक्षकांचे सहकार्य लाभले.