<
जळगांव-(चेतन निंबोळकर) तालुक्यातील पाळधी येथील नोबल इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थांची दिनांक १ आँगस्ट गुरूवार रोजी शाळेच्या चेअरमन सौ.अर्चना सुर्यवंशी यांच्या संकल्पनेतून नोबल इंटरनॅशनल स्कूल च्या इयत्ता २री ते ४थी च्या विद्यार्थांनी पोलिस दुरक्षेत्र पाळधी ला भेट दिली.
पोलिस आपले कार्य कसे सक्षमपणे पार पाडतात? त्यांची कार्यपद्धती कशी असते? त्यांचे कार्यक्षेत्र कसे ठरते? विविध गुन्ह्यांचा शोध कसा लावला जातो? या संदर्भात विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांनी पोलिस दादांना विविध प्रश्न विचारले आणि पोलिस दादांनी ही त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देऊन त्यांच्या शंकेचे समाधान केले.
यातून विद्यार्थ्यांना बरेचसे कायद्याचे ज्ञान मिळाले. या भेटीत विद्यार्थ्यांनी कर्तव्यदक्ष पोलिस दादांसाठी संदेशात्मक भेटकार्ड बनवून दिले. रविवारी पोलीस स्टेशन बंद असते का? या प्रश्नावर पोलिस दादांनी अभिमानाने पोलिस आपल्या सेवेत सदैव कसे तत्पर राहतात हे सांगितले. विद्यार्थ्यांच्या उत्साहाने भाराऊन पोलिस दादांनी सर्व विद्यार्थ्यांना चाँकलेट देऊन सर्वाचे कौतुक करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. योगेश करंदीकर यांच्यासह विजया मोरे, अश्विनी ठाकरे, सोनल कुंभार, गुणवंत पवार यांनी परिश्रम घेतले.