<
जळगाव(प्रतिनिधी)- येथील सिव्हिल इंजिनिअर असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद राठी, सचिव मिलिंद काळे, प्रकल्प प्रमुख राहुल पवार, सुनील यादनिक यांच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रातील गरीब गरजू कामगार, तसेच विधवा, यांना किराणा मालाचे वाटप घरपोच करण्यात आले. या किटमध्ये ५ किलो गव्हाचे पीठ, २ किलो तांदूळ, १ किलो मुंगडाळ, १ किलो तेल पाउच, १ किलो मीठ,१ किलो मीठ, हळद, तिखट, मसाला पॅकेट समाविष्ट आहे, या सामाजिक उपक्रमात क्षुधाशांती केंद्र प्रमुख श्री बिर्लाजी, विनोद पाटील, सुनील पाटील, चंदूदादा पाटील, हितेंद्र राठी, किशोर सुर्यवंशी, नवनीत सैनी, चंद्रशेखर कापडे व दानशूर दाते यांचे सहकार्य लाभले, यापूर्वी हि मागील दहा वर्षापासून जळगाव जिल्ह्यात आलेल्या संकटावर मात करण्यासाठी जळगाव सिव्हिल इंजिनिअर असोसिएशनने नेहमीच गरजवंताना मदतीचा हात दिला आहे व आज हि 30 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन वाढले अशी घोषणा मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांनी केली आहे. येणाऱ्या पुढच्या काळातही असोसिएशनचा पुन्हा मास्क, सँनिटायजर, किराणा सामान, दैनंदिन गरजेच्या वस्तू वाटप करण्याचा मानस आहे.