<
फैजपूर- येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याजवळ यावलकडे जाणारे सुमारे ६०हजार रुपये किमतीचे ६०० किलो गुरांचे मांस पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून डी वाय एस पी च्या पथकाने काल ताब्यात घेतले. यात मास वाहून नेणारी टाटा मॅजिक गाडी व साठ हजार रुपये किमतीचे गुरांचे मांस असा एकूण १ लाख ६० हजार रुपयांचा माल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यापैकी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून गुरुवारी मधुकर सहकारी साखर कारखान्याजवळ अजीम खान अजिज खान (कुरेशी मोहल्ला) याने त्याचे साथीदार सुलतान उर्फ कल्लू शेख चांद , व याकुब शेख सुगराती दोन्ही राहणार फैजपूर यांच्या मदतीने शहरातील धाडीनदी काठी कापलेल्या गुरांचे मांस यावल येथे शेख रईस याला पोहोचवण्यासाठी टेम्पो द्वारे (क्रमांक एम एच 12- 3941) दोनशे लिटरच्या बॅरलमध्ये घेऊन जात असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे व पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले या प्रकरणी पोस्टेला गुन्हा दाखल करण्यात आला असून ड्रायव्हर अश्पाक शेक युनुस, व दुसरा आरोपी अजिम खान अजित खान, यांना ताब्यात घेण्यात आले आहे तर चार आरोपी हे फरार आहे त्यामध्ये सुलतान उर्फ कल्लू चांदखा, याकुब शेख सुगराती, आसिफ रिक्षावाला रईस पूर्ण नाव माहित नाही रा यावल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
तपास डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रकाश वानखेडे सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे, पो काॅ दिलीप तायडे शरद शिंदे ,शैलेंद्र बनसोडे ,अल्ताफ किरण चाटे करीत आहे.