<
जळगांव(प्रतिनिधी)- येथील विठ्ठल रुक्माई फाउंडेशन मेहरून, संचलित कै. मातोश्री प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालय येथे कोरोनोच्या प्रादुर्भावामुळे सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आमच्या विद्यालयात इयत्तानिहाय व्हाट्सअप ग्रुप बनविण्यात आले असून या ग्रुपवर वर्ग शिक्षक तसेच इतर शिक्षक विषय निहाय दररोज गृहपाठ देण्यात येतो तसेच शिक्षक विषया संबंधित ऑडिओ व्हिडीओ स्वरुपात माहिती ग्रुप वर टाकण्यात येते तसेच या ग्रुपच्या माध्यमातून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते त्यात चित्रकला प्रश्नमंजुषा टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवणे कागदा पासून विविध वस्तू बनवणे याबाबत मार्गदर्शन केले जाते तसेच दर रविवारी अभ्यासाचा कंटाळा येऊ नये म्हणून पीडीएफ स्वरूपात गोष्टीसुद्धा टाकण्यात येतात याद्वारे विद्यार्थ्यांच्या वाचन केलेलाही वाव मिळतो या उपक्रमाबद्दल पालक तसेच विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला जातो तसेच त्यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. सोशल मीडियाची लोकप्रियता लक्षात घेता कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण माहिती तसेच उपाययोजना तसेच आजारासंबंधी लक्षणे याबाबत सविस्तर माहिती देण्यात येते. अभिनव उपक्रमासाठी संस्थेच्या वतीने जयश्री महाजन यांचे मार्गदर्शन लाभले या उपक्रमासाठी तंत्रस्नेही मुख्याध्यापक गजानन सूर्यवंशी तसेच रूपाली वानखेडे, मोहिनी चौधरी, अर्चना धांडे, धनश्री फिरके, लीना नारखेडे, रोहिणी सोनवणे, अविनाश महाजन, नरेश कोळी तसेच तुषार नारखेडे व दिपक बोर्डे यांचेही विशेष परिश्रम आहेत.