<
जळगाव – (प्रतिनिधी) – येथील जय दुर्गा प्राथमिक विद्यालय मेहरूण येथे दि 16 तारखेपासून लॉक डाउन असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळेने आपल्या विद्यार्थ्यनसाठी डिजिटल कलासरूम प्रमाणे अँप च्या माध्यमातून अध्यापन केले जात आहे तसेच अनेक ऑनलाईन वेबसाईट च्या माध्यमातून ऑनलाईन टेस्ट सुद्धा घेतल्या जात आहे,त्याअंतर्गत विद्यार्थी स्वत आवर्जून यास प्रतिसाद देत असून येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रत्येक वर्गानुसार व्हाट्सअप्प ग्रुप वर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करीत आहेत, यासाठी संस्थेचे अध्यक्ष तसेच कार्यकारणी मंडळ ,स्वत मुख्याध्यापक ,शिक्षक विद्यार्थ्याना मार्गदर्शन करीत आहेत.