<
जळगांव(प्रतिनिधी)- देशावर असलेले कोरोना महामारीचे सावटामुळे जळगावात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या आवाहानुसार आज नांद्रा बु, ता. जि. जळगाव येथे किशोर शालिग्राम आगिवाल यांचे ६१ वे वाढदिवस रक्तदान शिबिराचे आयोजन करून तसेच घरपोच अन्नदान वाटप करून साजरी करण्यात आले. यावेळेस रेड प्लस रक्तपेढी यांच्या कडून डॉ. भरत गायकवाड, सुरज पाटील, पंकज गायकवाड आणि दिपक पाटील यांनी गावकऱ्यांच्या स्वयमस्पूर्ती ने २६ पिशवी रक्त संकलन केले. यावेळेस हितेश आगिवाल यांनी सर्वांना कोरोना पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर बाबत मार्गदर्शन केले तसेच सर्वांना घरीच राहून मदत करण्यास आवाहन केले. या कार्यक्रमासाठी पो. पा. नितीन सोनवणे, आरोग्य अधिकारी रविकिरण पवार, जगदीश पाटील, पितांबर सपकाळे, एकनाथ सोनवणे, दगडु चौधरी, दिलीप आगिवाल, किशन सोमाणी, अशोक पाटील, निखिल चव्हाण, वाचनालय कट्टा समस्त ग्रामस्थ तसेच तरुण मंडळी यांनी परिश्रम घेतले.