<
जळगाव – येथील इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखेच्या वतीने आधार केंद्र व सेतु केंद्र सुरळीतपणे सुरू करण्यात आले आहे असुन यात प्रामुख्याने नवीन आधार कार्ड बनविणे व आधार कार्ड मध्ये आवश्यक दुरूस्ती करणे इत्यादि सुविधा आहेत.
या शिवाय दिव्यांग बांधवांसाठी अपंगत्व प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन नोंदणी, बस सवलत पाससाठी नोंदणी, सेतु केंद्र मार्फत चारित्र्य पडताळणी, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर, अँडमिशन साठी लागणारे दाखले, पॅनकार्ड, शासकीय उतारे इत्यादि सुविधा उपलब्ध करून देण्यात आल््या आहेत.
या सर्व सेवा सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यन्त “रेडक्रॉस भवन”, सिव्हिल हॉस्पिटल शेजारी, बी.जे. मार्केटजवळ उपलब्ध असणार आहेत.
तरी गरजूंनी या सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगावच्या वतीने करण्यात आले आहे.