<
१६ एप्रिल रोजी यावर्षी स्वतः चा वाढदिवस साजरा न करण्याचा घेतला निर्णय ओबीसी नेते अनिल महाजन यांनी
महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या सर्व पदधिकार्यांना व कार्यकर्त्यांना तसेच ओबीसी बहुजन समाजाच्या सर्व समाज बांधवांना व अनिल भाऊ महाजन यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मित्र परिवाराना सुचित करण्यात येते की,दिनांक १६ एप्रिल रोजी ओबीसी नेते,अनिलभाऊ महाजन यांचा वाढदिवस आहे. राज्यात व देशासह संपूर्ण जगात कोरोना या भयंकर आजाराचे संकट सर्वत्र पसरले आहे. आपण सर्व जण घरातच राहून या संकटावर मात करत आहोत. अतिशय भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वांचे कामधंदे व्यवसाय बंद आहेत. ०३ मे पर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे.सर्व सामान्य नागरीक हतबल झाले आहेत.
या सर्व गोष्टीचा विचार करून अनिल महाजन यांच्या आदेशाने यांच्या १६ एप्रिल रोजी च्या वाढदिवसाच्या सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत व वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय अनिल महाजन यांनी घेतला आहे. यासाठी राज्यभरातील सर्व कार्यकर्ते व मित्रपरिवार यांनी दूरध्वनी वरूनच व सोशल मीडियाच्या माध्यमातुन जास्त गाजा वाजा न करता वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायचे आहेत. कोणीही कुठला ही कार्यक्रम घेऊ नये याची सर्वांनी नोंद घ्यावी कोरोना आजाराचे संकट जे आपल्या देशावर आले आहे. त्यातून आपली सर्वांची लवकरा लवकर मुक्तता व्हावी यासाठी सर्वांनी १६ एप्रिल रोजी देवाला प्रार्थना करावी यांच वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हटल्या जातील.