<
जामनेर-(अभिमान झाल्टे) – कोरोना संकटामुळे लॉकडाऊन झालेल्या जनतेला राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दिलासा देण्याचे प्रयत्न केला आहे.
महाविकास आघाडी सरकारने गरीब आणि गरजू लोकांना लॉकडाऊनमध्ये अन्न धान्याचा तुटवडा भासू नये म्हणून रेशन दुकानावर तीन महिन्यांचे रेशन दिण्याचे आदेश केले आहें.
याचप्रमाणे शेतकीसंघ जामनेर मध्ये असलेले रेशनधारकांनी धान्य वाटप करतांना शासनाचे आदेशा नुसार शिस्त पद्धतीने प्रत्येक व्यक्तीला लाइन मध्ये व काही अंतरावर उभे कले जात आहे व धान्य वाटप केले .
असुन जेने करुन कोरोना महामारी मुळे दुष्परिणाम होणार नाही व हानी टळेल.
शिवाय रेशनकार्ड नसले तरी लॉकडाऊनमध्ये अन्न धान्याशिवाय उपासमारीची वेळ कुठल्याही कुटुंबावर येवू नये म्हणून एक फॉर्म भरण्यासाठी रेशन दुकानावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा फॉर्म भरुन प्रत्येकाला आता मोफत अन्न धान्य मिळणार आहे.
दरम्यान पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत 80 कोटी गरिबांना कवच मिळणार आहे. या योजनेअंतर्गत पुढील तीन महिन्यांपर्यंत गरिबांना 5 किलो तांदूळ मोफत मिळणार आहेत.