<
विरोदा(किरण पाटील)- येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजने चे स्वयंसेवक कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावा ची साखळी खंडित करण्यासाठी देशात लागू असलेल्या लॉकडाउन दरम्यान गावकऱ्यांना मदतीचा हात देत आहेत. राज्य सरकार आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यपीठ जळगाव चे मा कुलगुरू प्रा पी पी पाटील यांच्या निर्देशानुसार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी आणि एन एस एस कार्यक्रम अधिकारी डॉ शरद बिऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एन एस एस स्वयंसेवक भालोद, वाघोड, कोचुर रावेर, फैजपूर, रसलपुर, कोळवद आदी गावात मदत करीत आहेत. यात अक्षय पाटील (कोळवद ) व गौरव महाजन हे आशा वर्कर यांच्या सोबत सॅनिटायझर वाटप करीत आहेत, तर कोचुर येथील नेहा अरुण पाटील यांनी पोलिस व आशा वर्कर यांना चहा व नास्त्याची सोय मागील सलग 22 दिवसापासून स्वयं खर्चाने करीत आहेत. एन एस एस स्वयंसेवक हेमांगी कमलाकर पाटील भालोद यांनी ग्रामीण रुग्णालय, भालोद येथे कोविड- 19 जनजागृतीपर पोस्टर सादरिकरण केले. वाघोड येथील जयेश शहापुरे व हर्षल पाटील यांनी टमाटे, बिस्किटे व द्राक्ष वाटप करून हातमजुरी, गरीब, भिकारी अश्या लॉकडाऊन मुळे ग्रसीत जनतेला मदत केली. रावेर येथील 22 स्वयंसेवकांच्या गटाने stay home चा संदेश दिला. अश्याप्रकारे अडचणी च्या वेळी एन एस एस स्वयंसेवक सामाजिक जबाबदारी चे भान ठेवून स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य कर्मचारी तसेच समाज सेवक यांच्या मदतीला धावून जात इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे. यावेळी एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ शरद बिऱ्हाडे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ रवी केसुर, डॉ सरला तडवी हे सातत्यपूर्ण मार्गदर्शन करीत असून प्रत्येकाने आपआपली सामाजिक जबाबदारी समजून स्वतः सुरक्षित राहून कोरोना विषाणू च्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.